आज मी जिल्हा परिषद शाळा कुरखळी येथे शाळाभेटी साठी गेलो असता या ठिकाणी एक श्रद्धांजली कार्यक्रम सुरू होता,कुरखळी शाळेवर कार्यरत असलेले स्व.दिपक मुरलीधर मोरे,स्व.प्रमोद मुरलीधर मोरे,स्व.निताबाई भगवंतराव मोरे हे दिनांक १२/९/२००३ रोजी शाळा सुटल्यावर घरी परतीचा प्रवास करीत असताना कुरखळी फाट्याजवळ एक भीषण अपघातात यांचे निधन झाले,त्या घटनेला आज १५ वर्षे झालीत त्या निमित्ताने श्रद्धांजली वाहिली जात होती,तुम्ही म्हणणार यात काय विशेष आहे,होय हा श्रद्धांजली कार्यक्रम विशेषच होता कारण हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा कुरखळी च्या माजी विद्यार्थ्यांनी हया कार्यक्रमाचे आयोजन केले होते ,आज गुरूशिष्य परंपरा व्हॅट्स अँप व फेसबुक च्या जमान्यात कुठेतरी लयास गेले आहे असे चित्र सगळीकडे आपणास दिसत आहे याचं काळात १५ वर्षे पूर्वी दिवंगत गुरुवर्य प्रती ची हि श्रद्धा कौतुक करण्यासारखी आहे,त्यात ते सर्व दिवंगत गुरुजनांचे हे श्रेय आहे त्यांनी बिंबवलले संस्कार ,गुरूप्रेम, आई वडील प्रती आदर,राष्ट्रप्रेम, समाजा प्रती उदात्त भवना ही शिकवण दिसते,या धावपळीच्या जीवनात सुद्धा या सर्व तिघे गुरुवर्य प्रीतीची आस्था कुठेही कमी झालेले नाही,धान्य ते तिघे गुरुजन ,मी म्हणेन ते आज "शहीद" झाले आहेत कारण कर्तव्य पार पडून परतीच्या वाटेवर त्यांना हे वीरमरण आले आहे,जसा जवान राष्ट्र व तिरंग्याच्या सन्मानासाठी आपले सर्वोच्च बलिदान देतो व राष्ट्रभक्ती पोटी शहीद होतो,तसेच शिक्षक देशासाठी आदर्श नागरीक,इंजिनिअर, डॉक्टर, उद्योजक, राजकारणी, आणि "सैनिक" ही घडवतो म्हणून मी त्या सर्व दिवंगत गुरुवर्य यांना "शहीद" म्हटलो कारण शिक्षक हे राष्ट्र निर्माते आहेत,म्हणून मी मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो,आणि कुरखळी गावातील सर्व माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद ही देतो.
शांती ! शांती !! शांती !!!
श्री.मनोहर वाघ सर
9763236070
12/9/2018
सर मी आपला आभारी आहे की आपण आमच्या शाळेची घेतलेली दखल माजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देईल नेहमीच कौतुकास्पद उपक्रम राबविण्यासाठी.
ReplyDeleteआपले मनस्वी आभार
योगेश्वर मोरे
प्रमुख:- कुरखळी सर्वांगीण विकास मंच
प्रतिनिधी :- दै. देशदूत वृत्तपत्र
सहकारी:- माजी विद्यार्थी संघटन