चला करून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र,केंद्र वाठाेडे

⛳प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंंतर्गत


🌼केंद्र स्तरीय शिक्षण परिषद 🌼

केंद्र --वाठोडे दि.३१/१२/२०१६--वार-शनिवार.

स्थळ--केंद्रशाळा-वाठोडे ता.शिरपुर जि.धुळे,

👥उपस्थिती--शि.वि.अ.मा.डॉ .नीता सोनवणे मॕडम,

केंद्र प्रमुख मा.श्री.आर.पी.कोळीसर ,विषयसाधनव्यक्ति श्रीम.मुडावदकर ,वाठोडे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद..

💥आज दि.३१/१२/२०१६ वार शनिवार रोजी सकाळी ११.०० वाजता वाठोडे केंद्रातर्गत असलेल्या  शाळांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जि.प.केंद्र शाळा वाठोडे येथे घेण्यात  आली.ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.वाठोडे शाळेतीलविद्यार्थ्यीनींनी ईशस्तवन सादर केले .अध्यक्षीय निवड करण्यात  आली.त्यानंतर स्वागतगीत सादर केले .सरस्वतीपुजनानंतर सर्व  मान्यवरांचे श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

🌹वाठोडे केंद्र १००%डिजीटल झाले याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

🍁श्री. गणेश सोनवणे सर यांनी  गणितपेटी विषयी मार्गदर्शन केले.व संबोध स्पष्ट केले.

🌸केंद्रातील शिक्षकांनी आपल्या शाळेतील नविन सुधारणा व उपक्रम याविषयी अनुभव सांगितले ते पुढीलप्रमाणे ----

🎪जि.प.शाळा -वाठोडे--(श्री.कुवर सर)-शाळेत राष्ट्रीयगीत बँण्डवर घेतले जाते,वि.ना बँण्ड वाजविता येतो ,दर शनिवारी कवायत बँण्डवर घेतली जाते

🎪जि.प.शाळा कुंभारटेक--(श्री पावरा सर)--परिपाठाच्यावेळी विद्यार्थ्याचे वाचन घेतले जाते,वाचताना वि.ना कोठे अडचणी येतात यावर लक्ष देऊन त्यावर मार्गदर्शन केले जाते .

🎪जि.प.शाळा थाळनेर(श्री वाडीले सर)--शाळा डिजीटल झाली,हँण्डवाॕश स्टेशन बनविले ,शाळेच्या संरक्षण भिंतीवर काचा लावल्या ,शाळेत टीव्ही आल्यामुळे उपस्थिती वाढली.

🎪जि.प.शाळा भोरटेक(श्री.राजपुत सर)--गणित विषयावर मार्गदर्शन केले ,शाळेत डिजीटल क्लासारुम तयार केला,त्यामुळे वि.ची उपस्थिती वाढली ,ज्ञानरचनावाद यावर आधारित अध्यापन केले जाते.

🎪जि.प.शाळा दामसरपाडा--(श्री सावळे सर)--इ.२रीव३री च्या वि.ना गणित संबोध स्पष्ट केल्या मुळे वि.ना गणित विषय सोपा वाटु लागला ,वि.ना चित्रावरून गोष्ट सांगू लागतात,नेहा नावची मुलगी शब्दांवरुन गोष्ट सांगू शकते,गणितामुळे भाषा कडे दुर्लक्ष व्हायला नको,अशी त्यांनी खंत व्यक्त केली.

🎪जि.प.थाळनेरउर्दु (नाविद सर)--गणितपेटी सोबत विज्ञान पेटी चा विचार केला जावा,उच्च प्राथमिक शाळा साठी उपयोग केला जातो ,इंटरनेट सुविधा मुळे वि.ना अभ्यासक्रम सोपे वाटते.

🎪जि.प.शाळा जमादारपाडा--(श्री.खेडकर सर)--वि.चा वाचनाचा सराव केला जातो,

🎪जि.प.शाळा नवाडीपाडा--(श्री गावित सर)--शाळेत परिपाठ हा संगितमय वातावरणात घेतला जातो ,वि.लेझीम खेळतात,वि.चा अभ्यास दररोज तपासला जातो,खेळ खेळायला दिले जातात,मातीचे भांडी बनवितात ,शाळेत रांगोळी स्पर्धा ,हस्ताक्षर स्पर्धा घेतली  जाते त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत झाली .

🍁.शि.वि.अ.मा.डाँ.नीता सोनवणे मँडम यांनी सर्व प्रथम उपस्थित सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांना नवीन  वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व वाठोडे केंद्र डिजीटल झाल्याने सर्वाचे अभिनंदन केले सर्व शाळा व शिक्षक यांचा आढावा घेतला व मार्गदर्शनास सुरूवात केली .गुणवत्ता वाढ करण्यासाठी व १००% विद्यार्थी प्रगत करण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे . जुन २०१७मध्ये नमुना नं.१ व L,C,शासन निर्णयप्रमाणे नवीन नमुन्यात भरणे.रेकॉर्ड पुर्ण करणे .पुस्तकाचा वापर ग्रंथालयासाठी करणे ,अडगळीत पडलेले साहित्य बाहेर काढणे व त्याचा योग्य वापर करणे ,शालेय स्वच्छता व विद्यार्थी स्वच्छता याकडे अधिक लक्ष देणे.अशाप्रकारे  विविध विषयांवर मार्गदर्शन  केले .

💥श्रीम.मुडावदकर विषयसाधनव्यक्ती यांनी PSM प्रगत शाळेचे २५ निकष व गणित संबोध कार्य शाळेची गरज व महत्त्व स्पष्ट करून सर्व शिक्षकांना गणित प्रशिक्षणाचे online मागणी प्रपत्र भरण्याचे आवाहन केले .

💥    शिक्षण परिषदेत प्रत्येक शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला .शाळा १००%प्रगत करण्याचे आश्वासन  दिले.

💥कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री .कुवर सर यांनी  केले

✍शब्दांकन✍

श्रीमती मुडावदकर पी.डी.

विषयसाधनव्यक्ती

बी.आर.सी.शिरपूर,जि.धुळे.

🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾

⭕⭕⭕⭕ प्रचार व प्रसिद्धी ⭕⭕⭕⭕

🔵 मनाेहर पांडुरंग वाघ 🔵

साधनव्यक्ती, गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे

📱9763236070


No comments:

Post a Comment