सोलर डिजिटल स्कूल उदघाटन सोहळा वरुळ येथे संपन्न झाला

🔮 *सोलर डिजिटल स्कुल उदघाटन सोहळा व बीटस्तरीय शिक्षण परिषद* 🔮


🗓 *दि.15/09/2018 शनिवार*


⛳ *स्थळ :- जि.प.शाळा वरूळ, ता.शिरपूर, जि.धुळे*


🏮 जि.प.शाळा वरूळ, ता.शिरपूर येथे सोलर डिजिटल स्कुलचे उदघाटन करण्यात आले. डिजिटल वर्गखोल्या असलेल्या जि.प.शाळा वरूळ, विखरण व कुवे या तीन शाळांना सोलर पॅनलचे वितरण करण्यात आले.


🎀 *कार्यक्रमाचे उदघाटन मा.विनयजी सहस्त्रबुद्धे (खासदार, राज्यसभा)* यांनी केले. तसेच सोलर पॅनलचे वितरण ज्यांच्या सौजन्याने करण्यात आले ते *मा.हर्षलजी विभांडीक (रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई)* व प्रमुख पाहुणे म्हणून *मा.प्रकाशजी पाठक (भोसला मिलिटरी स्कुल, नाशिक)* उपस्थित होते. यासोबत कार्यक्रमासाठी सन्माननीय *जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य* तसेच  *मा.दिपकभाऊ गुजर (माजी उपसभापती, पं.स.शिरपूर), मा.प्रमोदजी पटेल (अध्यक्ष, इंग्लिश मेडीयम स्कुल, वरूळ) मा.पी.झेड.रणदिवे साहेब (गटशिक्षणाधिकारी, पं.स.शिरपूर),* तसेच गावातील प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, विखरण बिटातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व BRC कर्मचारी उपस्थित होते.


🥁 लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. वरूळ शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत गायन केले.


🏮 *मा.पी.झेड.रणदिवे साहेब (गटशिक्षणाधिकारी)* यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात साहेबांनी शिरपूर तालुक्याने डिजिटल शाळांबाबतीत केलेल्या प्रगतीचा इतिहास वर्णन केला. काही झोपडीत भरणाऱ्या शाळासुद्धा डिजिटल करून विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होण्याची यशोगाथा मांडली. सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांनी या नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत कौतुक केल्याचे साहेबांनी सांगितले. तालुका 100% डिजिटल करण्यात मोलाचे योगदान केलेले *मा.हर्षलजी विभांडीक हे आपले विद्यार्थी असून त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याचा उल्लेखही मा.रणदिवे साहेबांनी आवर्जून केला.*


🏮 *मा.विनयजी सहस्त्रबुद्धे (खासदार, राज्यसभा)* यांनी आपल्या भाषणात मा.हर्षलजी विभांडीक व मा.रणदिवे साहेबांचे कौतुक करून अभिनंदन करीत त्यांच्या कार्याची दखल घेतली. शिरपूर तालुका हा अत्यंत दुर्गम, आदिवासी भाग असून 100% शाळा डिजिटल करणे हे जवळपास अशक्यप्राय गोष्ट होती. असे असतांना सुद्धा अतिशय बिकट परिस्थितीत मा.हर्षलजी विभांडीक तसेच मा.रणदिवे साहेब व त्यांच्या टीमने गाव, वस्ती, पाडे, तांडे या ठिकाणी जाऊन कधी दिवसा तर कधी रात्री प्रेरणा सभा, लोकसभा घेऊन लोकांना डिजिटल शाळेचे महत्व पटवून दिले आणि  लोकसहभागातून शिरपूर तालुक्यातील 100% शाळा डिजिटल करून दाखवल्या. यामुळे विद्यार्थी पटसंख्या तर वाढलीच, शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी अध्ययन करू लागले. लॅपटॉप, संगणक, प्रोजेक्टर सहजरित्या हाताळू लागले. आणि ही परिवर्तनाची लाट निश्चितच सर्वांना प्रेरणा देणारी ठरली. डिजिटल शाळेसाठी सोलर पॅनलचे महत्व विशद करून येत्या काळात *शिरपूर तालुक्यातील 100 शाळांना सोलर पॅनलचे मोफत वितरण* करण्याची घोषणा केली. तसेच स्वच्छता अभियान बाबत माहिती दिली.


🏮 *मा.हर्षलजी विभांडीक* यांनी सोलर पॅनलची संकल्पना स्पष्ट करून येत्या काळात डिजिटल शाळांचे रूपांतर सोलर डिजिटल शाळेत परावर्तित करण्याची योजना सांगितली. वारंवार होणाऱ्या खंडित विज पुरवठेमूळे डिजिटल वर्गाध्यापनात व्यत्यय येत होता, ही बाब निदर्शनात आल्यावर शाळा नुसत्या डिजिटल करून उपयोग नाही, तर खंडित विजपुरवठ्याचा प्रश्न दूर करणे गरजेचे होते. यासाठी शाळांवर सर्वेक्षण करून एक प्रकारचा स्थायी वीजपुरवठा शाळेस उपलब्ध करून देण्याचे मनात आले आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी सोलर पॅनल द्वारे ऊर्जा मिळून वर्ग अखंडपणे सुरळीत सुरू राहील यासाठी कार्याला सुरुवात केली  असे त्यांनी सांगितले.


🏮 *मा.प्रकाशजी पाठक* यांनी त्यांचे अनुभव कथन करून सोलर डिजिटल स्कुल संकल्पनेचे कौतुक केले. तंत्रज्ञानाची कास धरून व कालानुरूप होणारे परिवर्तन स्वीकारल्यास विद्यार्थ्यांचे अध्ययन नैसर्गिकरित्या होण्यास मदत होते असे त्यांनी सांगितले. या महत्वाकांक्षी प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.


📕 यानंतर सर्व प्रमुख पाहुणे, पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी वरूळ गावात जाऊन काही ठिकाणी स्वच्छता करून स्वच्छता अभियानाची सुरुवात केली.


📕 या कार्यक्रमा नंतर विखरण बिटाची मासिक *शिक्षण परिषद घेण्यात आली. यात *मा.रणदिवे साहेब* यांनी शाळांचा अध्ययन स्तर आढावा घेतला. तसेच शिक्षकांनी आपल्या कौशल्याचा व शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. डिजिटल वर्गाध्यापन बाबत मार्गदर्शन केले.


📕 तसेच नुकतेच LBL (Level Base Learning) च्या प्रशिक्षणाचे अनुभव कथन प्रशिक्षणार्थ्यांनी केले व LBL चे स्वरूप स्पष्ट केले.


📕 शेवटी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या कॅम्प विषयी माहिती देण्यात येऊन शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.


📘 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.रणदिवे साहेबांनी केले


✍🏼 *संकलन व शब्दांकन* ✍🏼

*सचिन जडिये,*

*विषयसाधनव्यक्ती,*

*BRC, शिरपूर*

प्रचार व प्रसिद्ध

श्री. मनोहर वाघ सर,विषय साधनव्यक्ती

9763236070


No comments:

Post a Comment