शिरपूर येथे "व्हिजन कार्यशाळा" संपन्न






 *VISION WORKSHOP* 


मा.डॉ.विद्या पाटील मँडम (प्राचार्य, DIET, धुळे) यांच्या प्रेरणेने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे व गटसाधन केंद्र, पंचायत समिती, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने-


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत *व्हिजन कार्यशाळा*

आज दि.20/08/2016 शनिवार रोजी गटसाधन केंद्र, पंचायत समिती, शिरपूर, जि.धुळे येथे घेण्यात आली.


कार्यशाळेला सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व  विषयसाधनव्यक्ती उपस्थित होते.


*कार्यशाळेत उपस्थिती व प्रमुख मार्गदर्शक - मा.डॉ.विद्या पाटील मँडम (प्राचार्य, DIET धुळे),*

*मा. भरतजी कोसोदे साहेब (गटविकास अधिकारी, पं.स.शिरपूर),*

*मा.डॉ.महाजन सर (अधिव्याख्याता, DIET, धुळे),*

*मा.बाविस्कर सर (अधिव्याख्याता, DIET,धुळे),*

*मा.पी.झेड.रणदिवे (गटशिक्षणाधिकारी, पं.स.शिरपूर)*


*कार्यशाळेत प्रमुख  मार्गदर्शकांद्वारे चर्चीलेले ठळक मुद्दे....* 


 CSR... Corporate Social Responsibility


 PSM कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा 100% प्रगत करण्यात शिक्षकांपासून सर्व पर्यवेक्षिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका


 प्रगत शाळांसाठीचे 25 निकष व त्यानुसार कार्य करणे


 PSM कार्यक्रम शासन निर्णय व अंमलबजावणी


 ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन, डिजीटल शाळा, ISO शाळा, ABL शाळा


 PSM प्रेरणा सभा


 केंद्रप्रमुखांकडून केंद्रातील शाळांचा विविध विषयांवर आढावा


 विद्यार्थी गळती थांबवून सर्व शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणणे, टिकवणे व शिकवणे


 पायाभूत चाचणी विश्लेषण, निष्पत्ती, चर्चा


 अप्रगत विद्यार्थी व त्यांच्यासाठी नियोजन व कृतिकार्यक्रम


 अपेक्षित क्षमतानिहाय व कौशल्य विकसनासाठी नियोजन 

 शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रत्यक्ष वापर व विद्यार्थ्यांना हाताळू देणे, निसर्गाच्या सानिध्यात नेणे


 वाचन, लेखन, संभाषण, स्वअभिव्यक्ती, संख्याबोध, संख्यावरील क्रिया या सर्व अपेक्षित क्षमता प्राप्त होणेसाठी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना 100% प्रगत करणे.


 केंद्रांतर्गत स्नेहमिलन कार्यक्रम - हेतू, रूपरेषा, नियोजन व अंमलबजावणी


 शैक्षणिक मदत (साहाय्य), समुपदेशन, सुलभिकरण, प्रेरणा


 नाविण्यपूर्ण शैक्षणिक Blog ची निर्मिती व Update ठेवणे


 सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व विषयसाधनव्यक्तींनी कार्यशाळेत कृतियुक्त सहभाग घेऊन चर्चा, अनुभव कथन व शंका निरसन करून घेतले.



*✳ उदघाटन -* कार्यशाळेदरम्यान खालील नाविण्यपूर्ण उपक्रमांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


✅1) प्राचार्य मा.डॉ.विद्या पाटील मँडम यांच्या हस्ते Wireless Mouse ने clik करून *'गटसाधन केंद्र शिरपूर' या नावाच्या नाविण्यपूर्ण शैक्षणिक Blog चे उदघाटन* करण्यात आले. Blog बाबत सविस्तर माहिती विषयसाधनव्यक्ती मनोहर वाघ यांनी दिली.


✅2) गटविकास अधिकारी मा.भरतजी कोसोदे साहेब यांच्या हस्ते *विषयसाधनव्यक्तींद्वारे राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक सहाय्य उपक्रम पेटी व ई-शैक्षणिक सहाय्य (whatsapp) या उपक्रमांचे उदघाटन* करण्यात आले. सदर उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती विषयसाधनव्यक्ती रुपेश देवरे यांनी दिली.


कार्यशाळेचे सुत्रसंचालन विषयसाधनव्यक्ती सचिन जडिये, प्रास्तविक गटशिक्षणाधिकारी मा.रणदिवे साहेब व आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी मा.डॉ.निता सोनवणे मँडम यांनी केले.


* उपस्थिती व शब्दांकन *

*सचिन जडिये*

*विषयसाधनव्यक्ती,*

*गटसाधन केंद्र, शिरपूर, जि.धुळे


*प्रचार व प्रसिद्ध *

@ मनाेहर वाघ सर,

साधनव्यक्ती, गट साधन केंद्र, शिरपूर जि.धुळे

9763236070

---------------------------------------------------------------------------------------------------------









No comments:

Post a Comment