जिल्हा परिषद शाळा जामन्यापाडा(खैर.)ची शैक्षणिक सहल संपन्न







* जि प शाळा जामन्यापाडा(खैर), चिखलीपाडा ,कुंडीपाड  यांच सयुक्तिक विद्यमाने शैक्षणिक सहल संपन्न* 







*स्थळ: जामन्यापाडा(खैर) ते घृष्णेश्वर, वेरूळ लेणी, भद्रमारोती,दौलताबाद*


*आयोजक*

*जि. प.शाळा जामन्यापाडा(खैर)*

*जि प शाळा चिखलीपाडा*

*जि.प.शाळा कुंडीपाडा(खैर)*

केंद्र *पळासनेर* ता. शिरपूर जि धुळे

===============================

*उपक्रम* विद्यार्थी चे सप्तगुणाचा विकास व विचाराना चालना देणे.तसेच शालेय विद्यार्थ्यांना शिस्त व निसर्ग प्रेमाचे धडे देत नाविन्यपूर्ण उपक्रम


 


14/12/2017रोजी *माझी शाळा माझा उपक्रम*व शाळा एक उपक्रम अनेक अंतर्गत *शैक्षणिक सहल* नाविण्य पूर्ण उपक्रम *घृष्णेश्वर ,भद्रमारोती, वेरूळ लेणी ,दैलताबाद* येथे राबविण्यात आला.जि प शाळा जामण्यापाडा (खैर) .जि प शाळा चिखलीपाडा, जि प शाळा कुंडीपाड,यांच्या  सहकार्याने *शालेय विद्यार्थ्यांना शिस्त व निसर्ग प्रेमाचे धडे देत. नाविन्य पूर्ण उपक्रम आयोजित केला.

____________________________________________

*उत्सुकता* शैक्षणिक सहली बाबत मुलांची एवढी उत्सुकता होती की, आम्ही शिकवत असताना ,परिपाठात रोजच मुले उत्सकतेने विचारणा करत होते की, "सर सहल कधी जाणार ?? काय काय पाहायला मिळेल आम्हाला?? किल्ले कसे असतात?? लेणी म्हणजे काय ??", अश्या स्वरूपाचे प्रश्न करत होते...

*सहलीचा प्रवास* सहलीच्या दिवशी एखाद्या शहरातील नामकीत शाळेतील मुलांना शाळेत सोडायला सर्व पालक उपस्थित असतात त्याच प्रमाणे मुलाचे आई वडील  सहलीचा दिवशी पालक उपस्थित होते.... सहलीच्या दिवशी मुलेंच काय गावतील सर्च पालक व गावकरी जागे होते. अस वाटत होतं की जस आज गावात एखादा मोठा सण साजरा  केला जात आहे. प्रवास *जामन्यापाडा*(खैर) येथून सुरवात झली


*मनोगत मुलांचे* ," सर खूप मजा आली ... मी पहिल्यांदा बस मध्ये बसलो... एवढ्या लांब आमचे आई बाबा घेऊन जात नाही"..... असे बोलके वाक्य बोलत होते आणि प्रत्येक वेळेस नवं नवीन प्रश्न विचारत होते.

*घृष्णेश्वर* प्रथम आमची सहल ही "करुणा के स्वामी" शिवशंकर चा बारावा अवतार 'घृष्णेश्वर' येथे पोहचली. मंदिरा बाबत सर्व इतिहास , महत्व निर्माण , या बाबी सांगितले


*दौलताबाद* त्या नंतर आमची सहल दौलताबाद या ऐतिहासिक किल्ल्या कडे वडली,या ऐतिहासीक वास्तूची माहिती माझे सहकारी *श्री सखाराम गावळे* सरांनी प्रत्येक धरोहर ची विद्यार्थ्यांना समजेल असे सांगत होते...... तसेच किल्ला वर " वानर सेनाना"(माकड) पाहून आमचे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले व त्यांचा नकला करत होते.....व किल्ला चड उतर करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता....तेथून परत आम्ही भद्रमारोती मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मुलांनी आणलेला जेवणाचं डब्बा मनसोक्त खाल्ला ...व सहलीचा मुख्य स्थळा कडे वढलो

*वेरूळ* सहलीचा शेवटचं स्थळ म्हणजे वेरूळ लेणी होय. मुले किल्ला चढउतार करून दमले होते... पण लेणी पाहताच आचार्य चकित झाले होते व त्यांचा थकवा तेव्हाच निघून गेला .पुन्हा नव्या दमाने  मुले लेणी पाहण्यात गुंग झाले... लेणी म्हणजे काय ??? याच उत्तर मुलांना मिळालं होतं ... लेणी विषयीची पूर्ण माहिती मी (*कैलास पावरा*) सांगितले


विद्यार्थी च्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झालेलं पाहून आम्हाला ही समाधान वाटलं. ...


आम्ही शाळेत बसवलेली सगळी गाणी बस मध्ये बसून पूर्ण रस्त्यात म्हणून घेतले ..... मुले ही गाणी आवडीने म्हणत होते .नक्कला वगैरे प्रकारांना ऊत येई पर्यंत मजा केली. आमच्या शिक्षकांच्या नक्कला त्यांच्याचसमोर करण्याची ही एकमेव संधी आम्हाला मिळाली. आणि गाणी गाऊन  सगळ्यांची पुरेवाट झाली...   परतीचा प्रवास  सहलीची आठवणी घेऊन सुरु झाला ..... *विशेष म्हणजे* आमच्या सोबत आमचे अधिकारी वर्ग ही मुलांन मध्ये बसून गाण्याचे अंताक्षरी खेळत होते


- लेखन -

*कैलास पावरा*

जि. प.शाळा जामण्यापाडा(खैर)

*प्रचार व प्रसिद्धी *

श्री. मनोहर वाघ सर,शिरपूर


                                                               ******* सहलीचे क्षणचित्रे ************














































"शिरपूर येथे वाचन क्षमता विकसन कार्यशाळा संपन्न"

"वाचन क्षमता विकसन कार्यशाळा"

--------------------------------------------------------

शिरपुर येथिल पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल येथे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली "वाचन क्षमता विकसन कार्यशाळा संपन्न झाली "आज कार्यशाळा समारोपाच्या दिवशी प्राचार्य मा.डॉ. विद्या पाटील यांनी भेट दिली व शिक्षकांशी संवाद साधताना म्हणाल्यात की प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवत असताना धुळे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक  दृष्टीने सक्षम करण्यासाठी एकजुटीने कार्य करूया व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवून या

या प्रसंगी श्री.पी.झेड.रणदिवे गटशिक्षणाधिकारी शिरपूर यांनी कार्यशाळा आयोजनाचा उद्देश उपस्थितांना समजावून सांगितला.विषय सहायक श्रीमती. सुधर्मा सोनवणे सुध्दा उपस्थित होत्या.

या कार्यशाळेत ५१ शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत, साधनव्यक्ती म्हणून श्री. गोपाल कुमावत,श्री. मल्हारी सूर्यवंशी,श्रीमती. माधवी देसले, श्रीमती. तृप्ती शिंदे, श्रीमती.शिवांगी देवरे,रामदास सर,यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले,मुलांना वाचन क्षमता ९० दिवसात याव्यात यासाठी विद्या प्राधिकरण, पुणे यांनी शैक्षणिक साहित्यची एक किट सुद्धा पुरवली आहे या द्वारे जलद व प्रभावी वाचन क्षमता विकसित करण्यास मदत होईल, या कार्यशाळेचे सुत्रसंचालन श्री. मनोहर वाघ सर यांनी केले व आभार श्री.सचिन जडिये सर यांनी मानलेत.

*प्रचार व प्रसिद्धी*

श्री. मनोहर वाघ सर,तंत्रस्नेही साधनव्यक्ती,

गट साधन केंद्र, शिरपूर जिल्हा धुळे

************* कार्यशाळेचे क्षणचित्रे ****************


शिरपूर येथे थेरपी शिबिराचे आयोजन संपन्न

*शिरपूर येथे फिजिओथेरपी  आठवडा संपन्न*

सर्व शिक्षा अभियान जि प धुळे व जिल्हा शैक्षाणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था धुळे यांच्या संयुक्त प्रेरणा व मार्गदशर्नाने समवेशित शिक्षण गट साधन केंद्र पंचायत समिती शिरपूर विभागाने शिरपूर गटातील 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग विद्यार्थयनसाठी  (सेरेब्रल पाल्सी ,मतिमंद, बहुविकलांग,अस्थिव्यंग इ) फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन  *साईतेज फिजिओथेरपी सेंटर आशीर्वाद हॉस्पिटल शिरपूर* डॉ. नैना पाटील फिजिओ थेरपिस्ट यांच्या  सेंटर मध्ये *फिजिओथेरपी आठवडा*दिनांक 14 /12 17 ते 20 /12/17 या कालावधीत संपन्न झाला.

सदर शिबिरासाठी जिल्हा शैक्षणिक व्यवसायिक विकास संस्था धुळे प्राचार्य डॉ.विद्या पाटील व शिरपूर गटाचे गटशिक्षणाधिकारी श्री पी.झेड.रणदिवे  व सोबत गटसमन्वयक श्री आर के गायकवाड व विषय सहायक श्रीम.सुधर्मा सोनवणे (DIECPD धुळे) यांनी भेटी दिल्यात,यावेळी दिव्यांग विद्यार्थी व पालकांना डॉ.विद्या पाटील प्राचार्य (DIECPD)यांनी फिजिओ थेरपीचे महत्व व उपयोग किती चांगले असते या बाबत पालकांना उद्बोधन व मार्गदर्शन केले श्री पी झेड रणदिवे गशिअ शिरपूर यांनी प्रत्यक्ष दिव्याग मुलांशी चर्चा करून नियमित शाळेत पाठवण्या साठी पालकांना मार्गदर्शन केले

सदर शिबिरासाठी समवेशित शिक्षण विभागातील विषयतज्ञ *श्री पी के बागुल व श्री प्रमोद भोई, निलेश मराठे,मोतीलाल पाटील,राहुल पाटील,बाळा बोरकर,कु.स्वाती देवांग,यांनी परिश्रम घेतले,सुत्रसंचालन श्री.मनोहर वाघ यांनी केले*

पालकांनी या फिजिओथेरपी आठवड्यात बालकांना मोफत थेरपी दिले व आनंद व्यक्त केला


*प्रचार व प्रसिद्धी*

श्री. मनोहर वाघ सर,तंत्रस्नेही साधनव्यक्ती, शिरपूर

**************** क्षणचित्रे *******************


राज्यस्तरीय विषय साधनव्यक्ती कार्यशाळा अमरावती येथे उत्साहात संपन्न



विषय साधनव्यक्ती यांची एक दिवशीय कार्यशाळा 








*आनंदसाठी काम करा मा नंदकुमार साहेब(प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग)यांचे विषय साधनव्यक्ती यांच्या "राज्यस्तरीय शिक्षण परीषदमध्ये" मौलिक प्रतिपादन.*


*विषय साधनव्यक्ती प्रदेश महासंघ म.रा*

__________व्दारा_________

             

*विषय साधनव्यक्ती यांची एक दिवशीय कार्यशाळा*


*(दिनांकः-१०.१२.२०१७)*


*स्थळः-संगीत सुर्य केशवराव भोसले सभागृह अमरावती.*



*उद्दघाटकः-मा नंदकुमार साहेब.*

*अध्यक्षः-मा डाॅ.सुनिल मगर साहेब.*

*प्रमुख अतिथीः-मा किरण कुलकर्णी साहेब मु का अ अमरावती,मा सिद्धेस वाडकर सर शिक्षण सल्लागार,मा आंबेकर सर प्राचार्य DIECPD अमरावती,मा.रत्नमाला खडगे मॅडम प्राचार्य DIECPD वर्धा.मा शाम मक्रमपुरे सर सहा.कार्यक्रम अधिकारी व इतर मान्यवर मंडळी.*

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संकलन/उपस्थित/मनोगत✍

*चांगदेव सोरते साधनव्यक्ती भामरागड*

------------------------------------------

*प्रथमतः वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,वंदनिय राष्ट्रसंत गाडगे महाराज,डाॅ.शिवाजीराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पुजन करून मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

लगेच मान्यवरांचा स्वागत समारंभा घेण्यात आला. लागलीच कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री प्रकाश आंबेकर सर सचिव प्रदेश महासंघ यांनी केले.

_________________________

*मा डाॅ सुनिल मगर साहेब यांचे मार्गदर्शन.*

*मुलांच्या क्षमता ओळखुन काम करा.

*मुलांची वाचन क्षमता विकसीत करणे आवश्यक आहे.

*वाचन क्षमता विकास कार्यक्रमाचा लाभ घेऊन शाळा स्तरावर त्याचा प्रत्यक्ष वापर व्हावा.

*गुणवत्ता विकासात विषय साधनव्यक्ती यांची भुमिका महत्वाची आहे.

*साधनव्यक्तीना आपले काम दाखविण्याची उत्तम संधी लाभली आहे.

*प्रत्येक मुलाला समजुन घेऊन त्या नुसार नियोजन करावे.

*यश येत नसेल तेव्हा आपली अध्यापन पद्धती बदलुन योग्य सहाय्य करा.

________________________

*मा किरण कुलकर्णी साहेब यांचे मार्गदर्शन*

*समाजाच्या आवश्यक गरजानुसार शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे.शिक्षणातूनच पुर्ण करता येईल.हे शक्य आहे.

*मा.नंदकुमार साहेब आपल्याला लाभल्यापासुन शिक्षणात,राज्यात शैक्षणिक वातावरण तयार झाले आहे.

________________________



*आपले प्रेरणा मा.नंदकुमार साहेब यांचे मार्गदर्शन*


*साधनव्यक्तीच्या निर्मिती पासुन सर्वात मोठा कार्यक्रम.याचा मला आनंद होत आहे.

*विषय साधनव्यक्तींनी आनंदासाठीच कार्य करावेत.

*मुल हे मानवाचे मुल आहे,बोललेले त्याला कळतो,ते कळण्यासाठी उत्तम सहयोग करा.

*प्रथम आपण मानव आहोत,त्यामुळे माणुसकीसाठी १००% वेळ देणे आवश्यक आहे.

*आपला वापर मुलांसाठी व समाजासाठी करा.

*माझ्यामुळे ईतरांच्या आयुष्यात काय घडते?याचा विचार करून कार्य होणे आवश्यक आहे.

*तालुक्यातील शाळांची,सर्व विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उत्तमातील उत्तम प्रयत्न आवश्यक आहेत.

*मी नित्य आनंदी कसा राहीन?यासाठी प्रयत्न करावेत,सोबतच मुल शिकत नसेल तर ते दुःख आहे.दूःख संपवायला शिकले पाहिजे.

*राज्यातील सर्व मुलांना वाचन येणे अत्यावश्यक आहे.अपयश आले की आनंद होऊच शकत नाही.

*विद्यार्थी न शिकणे हा त्याच्या भविष्यातील त्रास आहे.

*राज्याचे स्वप्न आंतरराष्ट्रीय शाळा साकार करणे आहे.सर्वांच्या उत्तम कार्याने शक्य आहे.

*सर्व मुलांची मुलभुत वाचन संस्कृती विकसीत करून मुलांना सन्मान द्या.

*गरजेनुसार भाषा शिका,मेळघाट,भामरागड व इतर ठिकाणी विविध भाषा बोलल्या जातात,तेथील स्थितीनुसार कार्य केले पाहीजे.

*८ जून-२०१७ च्या शासन निर्णयानुसार परीणामासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. वापर परीणामासाठीच केल्या जावा.

      सिंगापुर,हाँगकांग,जपान,हे देश आशिया खंडातील असुन पुढे आहेत.आपणही आशिया खंडात असुन मागे का?साहेबांनी विविध प्रकारचे उदाहरणे देऊन अतिषय मार्मिक मार्गदर्शन करीत विषय साधनव्यक्तींकडुन अधिक उत्तम कामाची आशा ठेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.


*कार्यशाळेचे सुत्रसंलालन श्री राजेश नाईक,श्री चेतन गायकवाड,श्री अरून पालवे यांनी केले तर आभार विवेक राऊत यांनी मानले.तंत्रज्ञान सहाय्य श्री मनोहर वाघ यांनी काम पाहिले.राज्यभरातुन १७०० विषय साधनव्यक्ती उपस्थित होते.राज्यातील सर्व विषय साधनव्यक्तीं यांनी परमेश्वर काकडे यांच्या नेतृत्वात,अमरावती टिमच्या सहकार्यानी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्व.जिल्ह्यांनी सहयोग दिले.*


*✍संदेश - आपली उपयोगीता हेच आपले मूल्य आहे.*






" जागतिक अपंग दिन " उत्साहात साजरा.

*जागतिक अपंगदिन-जि.प.शाळा लाकड्या हनुमान*

    शिरपुर तालुका आदिवासी भागातील लाकड्या हनुमान जिल्हा परिषद मराठी प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेत *जागतिक अपंगदिन* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.लाकड्या हनुमान गावातील दिव्यांग विद्यार्थी व व्यक्ती यांचा शोध विद्यार्थी व शिक्षक यांच्या मार्फत करुन दिव्यांग महिला नवादी रुस्तम पावरा तसेच विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक अनिल महिरराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     दिव्यांग व्यक्तींना आपण सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीसाठी विद्यार्थी व शिक्षक बांधवांनी नेहमी तत्पर राहणे गरजे आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक पाटील,आभार गणेश शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमाला मोहन पावरा,ग्रामसेवक निलेश पाटील,के.डी.पावरा, शिक्षक-शिवराम पाडवी,राहुल पाटील,वंदना कोळी उपस्थित होते.

* प्रचार व प्रसिद्ध *

@ श्री. मनोहर वाघ सर,विषय साधनव्यक्ती, गट साधन केंद्र, पंचायत समिती, शिरपूर जिल्हा धुळे


समावेशित शिक्षण समजून घ्या जरा मित्रहो

*  समावेशित शिक्षण  *


*दिव्यांगजन अधिकार अधिनियम २०१६.  नुसार यू -डायस २०१७ -१८ मध्ये २१ दिव्यांग प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे . आपल्या शाळेत असणाऱ्या दिव्यांग बालकांची ओळख व्हावी म्हणून २१ प्रवर्गा विषयी माहिती देण्यात येत आहे* .


*१) पूर्णतः अंध = (Blindness)*


» दृष्टीचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टीहीन असणे.

» डोळे जन्मत बंद असणे .

» हलन चलन करताना अडचणी येतात.


*२. अंशतः अंध (Low Vision)*


» सामान्य दृष्टी पेक्षा कमी दिसणे.

»दूरचे /जवळचे कमी दिसणे .

»पुस्तकावरील पाहताना वाचताना लिहताना अडचणी येतात .

»उपचार करूनही डोळ्यांना बरोबर न दिसणे .


*३)कर्णबधीर (Hearing Imapairment)*


»कोणताही आवाज ऐकू न येणे .

कमी ऐकू येणे .

»कानाचा श्रवण ६० db किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा व्यक्तींना कर्णबधीर व्यक्ती म्हणतात .


*४) वाचा दोष (Speech and Language Disability)*


» अडखळत बोलणे स्पष्ट बोलणे.   शब्दांची तोडफोड करणे.

» बोलताना शब्द मागे पुढे करणे त्यात तारतम्य नसणे यालाच वाचा दोष असे म्हणतात .

» जीभ जाड असणे, जिभेला शेंडा नसणे,  तोतरे बोलणे ,

» टाळूला छिद्र असणे.

» clept palete.


*५. अस्थिव्यंग ( Locomotor Disability)*


» ज्यांची हाडे ,सांधे, स्नायू हे योग्य प्रकारे कार्य करत नाही अशा मुलांना अस्थिव्यंग मुले असे म्हणतात.

» हलन चलन क्रिया करण्यास अक्षम .

» सहज दिसणारे अपंगत्व


*६) मानसिक आजार (Mental Ellness)*


» असामान्य किंवा अस्वाभाविक वर्तन .

» खूप कमी बोलणे किंवा खूप जास्त बोलणे .

» भयानक स्वप्न पडतात .

» भ्रम आभास असतो .

» कोणत्याही वस्तूला पटकन घाबरतात किंवा घाबरत नाही.


*७) अध्ययन अक्षम (Learning Disability)*


» वाचन लेखन गणितीय क्रिया अडचण .

» आकलन करण्यास अवघड जाते.

» अंक ओळखण्यात गोंधळ,  उलटे अक्षर लिहिणे ,  शब्द गाळून वाचणे.

» काही मुलांमध्ये वर्तन समस्या

» कमी संभाषण दिसून येते .

» बुद्ध्यांक सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त राहू शकतो .

» विशिष्ट अध्ययनात अडचणी येतात .


*(८. मेंदूचा पक्षाघात (Cerebral Palsy)*


» हालचालींवर नियंत्रण नसते .

» अवयवांमध्ये ताठरता असते .

» मेंदूला इजा झाल्याने हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी निर्माण होतात .

» मेंदूचा शरीरावर ताबा राहत नाही.

» हलचल क्षमता कमी असते.


*९) स्वमग्न (Autism)*


» स्वतःच्याच विश्वात हरवलेले असतात.

» भाषिक कौशल्य कमी विकसित झालेले असतात.

» बदल न आवडणे त्या बदलाला तात्काळ राग व्यक्त करणे.

» खेळणी, वस्तू यासोबत अधिक लगाव असतो.

» स्वतःच्या भाव विश्वात रमून गेलेले असतात.


*१०)बहुविकलांग ( Multiple Disability)*


» एक किंवा जास्त अपंगत्व असते .

» अशा बऱ्याच मुलांना चालतानां बोलतानां , उभेराहतांनां ,  शि- शू ,  दैंनदिन  कार्य करतानां समस्या असतात. (ADL) 


*११) कुष्ठरोग (Leprosy Cured Persons)*


» हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे .

» त्वचेवर चट्टे , काळे डाग असतात .

» हात,पाय, बोटे सुन्न पडतात .


*१२) बुटकेपणा (Dwarfism)*


» सामान्य मुलांपेक्षा खूप कमी उंची असलेल्या मुलांना बुटकेपणा असलेले मुले म्हणतात.

» उंची फार कमी असते .


*१३) बौद्धिक अक्षमता (Intellectual Disability)*


» बौद्धिक क्षमता( IQ) ही ७० पेक्षा  कमी असते .

» दैनंदिन कार्य, सामाजिक कार्य, दैनंदिन व्यवहार, करण्यास कठीण जाते .

» तार्किक प्रश्न सोडविताना अडचणी जातात .

» नवीन वातावरणात समायोजन करताना अडचणी जातात .

» काही मुलांना वर्तन समस्या असतात .


*१४) माशपेशीय क्षरण (Mascular Disability)*


» गटागटाने मांसपेशी कमकुवत होतात .

»उभे होतानां हाताचा व गुडघ्याचा आधार घ्यावा लागतो.

» मुलींपेक्षा मुलांमध्ये हा आजार जास्त असतो .


*१५) मज्जासंस्थेचे तीव्र आजार (chorinic Neurological Conditions)*


» मेंदूमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टिममध्ये विकृती झाल्याने हा आजार होतो.


*१६) मल्टिपल स्क्लेरोसिस (Multiple sclerosis)*


» हातापायातील स्नायूंमधील ताठरपणा किंवा कमजोरी संवेदनांमध्ये परिवर्तन होतो.

» स्नायूमध्ये स्थितीला येथे व स्नायू काम करणे कमी करतात .

» मलद्वार व मूत्राशयावर नियंत्रण कमी होते व कार्य कमी होते .


*१७) थॅलेसिमिया (Thalassemia)*


» रक्ताची कमतरता

» वारंवार रक्त पुरवावे लागते .

» चेहरा सुखावलेला असतो .

वजन वाढत नाही .

» श्वास घेण्यात त्रास होतो .

» वारंवार आजारी पडतात .


*१८) अधिक रक्तस्त्राव (Hemophilia)*


» हा अनुवांशिक रक्तविकार आहे

रक्त वाहिन्यातील बिघाडामुळे हा रोग होतो .

» यामध्ये रक्तस्त्राव होतो .

» जखमा झाल्यास अधिक रक्तस्त्राव होतो .

» कधी कधी रक्तस्त्राव थांबत नाही.

» रक्तस्राव बंद न झाल्याने शरीराचा भाग फुगतो.

 

*१९) सिकल सेल (Sickle Cell Disease)*


» रक्ताचे प्रमाण कमी असणे .

» रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव अशक्त होतात .

» शरीरातील पेशींचा आकार विळ्यासारखा होतो .

» हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो .


*२०) अॅसिड अटॅक (Acid Attack Victim)*


»अॅसिड अटॅकमुळे चेहरा, हात, डोळे  यावर परिणाम होतो.

» त्वचा भाजल्यासारखी दिसते .

» चेहरा विद्रुप होतो .


*२१) कंपवात रोग (Parkinson's Disease)*


» रेणूच्या अभावामुळे रोग्याला  कंप सुटतो .

» हालचाली संथ होतात स्नायू ताठर  होतात .

» वजन कमी होत जातो .

» वयाच्या ५० ते ६० ज्या दरम्यान होतो.

साहाय्य :-  श्री. पी. के.बागुल ,विषयतज्ज्ञ

                श्री. प्रमोद सुखदेव भोई ,विषयतज्ज्ञ

सर्व विशेष शिक्षक गट साधन केंद्र ,शिरपूर जिल्हा धुळे

       


प्रचार व प्रसिद्ध

@ मनोहर वाघ सर ,विषय साधनव्यक्ती, शिरपूर


शैक्षणिक सहलीसाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध

*शैक्षणिक सहलिकरिता प्रासंगिक करारावर बस घेण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना व अटी*


*शैक्षणिक सहलीसाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध*


*अनुभवी मार्गदर्शक चालक उपलब्ध*


*शैक्षणिक सहलीकरिता बस प्रतिकिमी दर 24 रुपये*


*12 तासात किमान 200 किमी बस धावली पाहिजे*


*24 तासात किमान 300 किमी बस धावली पाहिजे*


*12 वर्षाखालील 3 हाफ विद्यार्थ्यांसाठी 2 फुल असे समाजावे*


*शैक्षणिक सहलीकरिता एका बस मध्ये 4 शिक्षक पाहिजेत*


*शैक्षणिक सहलीकरिता 10 मुलींमंध्ये 1 महिला शिक्षक आवश्यक*


*शैक्षणिक सहलीकरिता सेवाकर 100% माफ करण्यात आलेले आहे*


*शैक्षणिक सहलीकरिता आवश्यक कागदपत्रे!*


*शिक्षण अधिकारी परवानगी पत्र*


*शाळेच्या मुख्याध्यापकाचे बस मागणी पत्र*


*विद्यार्थी यादी 2 प्रतिमध्ये आवश्यक*


संपर्क-

          स्वाती पाटील

       आगर व्यवस्थापक

        *शिरपूर आगार*

         02563-255068


सहाय्य :- पंचायत समिती, शिक्षण विभाग,शिरपूर

02563-265200/300