*शिरपूर येथे फिजिओथेरपी आठवडा संपन्न*
सर्व शिक्षा अभियान जि प धुळे व जिल्हा शैक्षाणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था धुळे यांच्या संयुक्त प्रेरणा व मार्गदशर्नाने समवेशित शिक्षण गट साधन केंद्र पंचायत समिती शिरपूर विभागाने शिरपूर गटातील 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग विद्यार्थयनसाठी (सेरेब्रल पाल्सी ,मतिमंद, बहुविकलांग,अस्थिव्यंग इ) फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन *साईतेज फिजिओथेरपी सेंटर आशीर्वाद हॉस्पिटल शिरपूर* डॉ. नैना पाटील फिजिओ थेरपिस्ट यांच्या सेंटर मध्ये *फिजिओथेरपी आठवडा*दिनांक 14 /12 17 ते 20 /12/17 या कालावधीत संपन्न झाला.
सदर शिबिरासाठी जिल्हा शैक्षणिक व्यवसायिक विकास संस्था धुळे प्राचार्य डॉ.विद्या पाटील व शिरपूर गटाचे गटशिक्षणाधिकारी श्री पी.झेड.रणदिवे व सोबत गटसमन्वयक श्री आर के गायकवाड व विषय सहायक श्रीम.सुधर्मा सोनवणे (DIECPD धुळे) यांनी भेटी दिल्यात,यावेळी दिव्यांग विद्यार्थी व पालकांना डॉ.विद्या पाटील प्राचार्य (DIECPD)यांनी फिजिओ थेरपीचे महत्व व उपयोग किती चांगले असते या बाबत पालकांना उद्बोधन व मार्गदर्शन केले श्री पी झेड रणदिवे गशिअ शिरपूर यांनी प्रत्यक्ष दिव्याग मुलांशी चर्चा करून नियमित शाळेत पाठवण्या साठी पालकांना मार्गदर्शन केले
सदर शिबिरासाठी समवेशित शिक्षण विभागातील विषयतज्ञ *श्री पी के बागुल व श्री प्रमोद भोई, निलेश मराठे,मोतीलाल पाटील,राहुल पाटील,बाळा बोरकर,कु.स्वाती देवांग,यांनी परिश्रम घेतले,सुत्रसंचालन श्री.मनोहर वाघ यांनी केले*
पालकांनी या फिजिओथेरपी आठवड्यात बालकांना मोफत थेरपी दिले व आनंद व्यक्त केला
*प्रचार व प्रसिद्धी*
श्री. मनोहर वाघ सर,तंत्रस्नेही साधनव्यक्ती, शिरपूर
**************** क्षणचित्रे *******************
No comments:
Post a Comment