" जागतिक अपंग दिन " उत्साहात साजरा.

*जागतिक अपंगदिन-जि.प.शाळा लाकड्या हनुमान*

    शिरपुर तालुका आदिवासी भागातील लाकड्या हनुमान जिल्हा परिषद मराठी प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेत *जागतिक अपंगदिन* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.लाकड्या हनुमान गावातील दिव्यांग विद्यार्थी व व्यक्ती यांचा शोध विद्यार्थी व शिक्षक यांच्या मार्फत करुन दिव्यांग महिला नवादी रुस्तम पावरा तसेच विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक अनिल महिरराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     दिव्यांग व्यक्तींना आपण सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीसाठी विद्यार्थी व शिक्षक बांधवांनी नेहमी तत्पर राहणे गरजे आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक पाटील,आभार गणेश शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमाला मोहन पावरा,ग्रामसेवक निलेश पाटील,के.डी.पावरा, शिक्षक-शिवराम पाडवी,राहुल पाटील,वंदना कोळी उपस्थित होते.

* प्रचार व प्रसिद्ध *

@ श्री. मनोहर वाघ सर,विषय साधनव्यक्ती, गट साधन केंद्र, पंचायत समिती, शिरपूर जिल्हा धुळे


No comments:

Post a Comment