*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत*
⚫केंद्र स्तरीय शिक्षण परिषद व डिजीटल वर्गाचे उदघाटन संपन्न ⚫
*केंद्र : पळासनेर*
*दि.17/12/2016 शनिवार*
*🎪स्थळ - जि.प.शाळा चारणपाडा, ता.शिरपूर, जि.धुळे 🎪*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
🔵 *उपस्थिती* - शिक्षण विस्तार अधिकारी मा.बी.एस.कोळी साहेब, केंद्रप्रमुख मा.बी.के.मोरे सर, विषयसाधनव्यक्ती सचिन जडिये सर, दिपक कोळी सर, शा.व्य.समिती अध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ, पळासनेर केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद
🔴 आज दि.17/12/2016 वार शनिवार रोजी सकाळी ठिक 11:00 वाजता पळासनेर केंद्रांतर्गत असलेल्या शाळांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जि.प. शाळा चारणपाडा येथे घेण्यात आली. ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. चारणपाडा शाळेच्या विद्यार्थीनींनी ईशस्तवन सादर केले.अध्यक्षीय निवड करण्यात आली. त्यानंतर स्वागतगीत सादर केले. सरस्वतीपूजनानंतर सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प, देवून स्वागत करण्यात आले.
💻 यानंतर चारणपाडा शाळेतील *डिजीटल वर्गाचे उदघाटन* मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी *विषयसाधनव्यक्ती सचिन जडिये सरांनी* डिजीटल वर्गाची गरज व महत्व विषद करुन डिजीटल वर्गाची संकल्पना, अध्यापन पद्धती, साहीत्य साधने व अभ्यासक्रमाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.
⚫*डिजीटल वर्ग निर्मिती प्रक्रियेत धुळे येथील *मा.श्री.हर्षल विभांडिक सर* यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले. याबद्दल त्यांचे चारणपाडा शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करून आभार मानण्यात आले.
⚫ *जि.प.शाळा शेमल्या येथील उपशिक्षक श्री.कुमठेकर सर* यांनी गणित संबोध कार्यशाळेतील अनुभव व मुलभूत संबोधांचे सादरीकरण केले.
⚫ *विषयसाधनव्यक्ती सचिन जडिये सर* यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिक्षण परिषदेचा उद्देश्य/हेतू सांगितला तसेच गणित संबोध कार्यशाळेची गरज व महत्त्व स्पष्ट करून सर्व शिक्षकांना गणित प्रगल्भीकरण प्रशिक्षणाचे online मागणी प्रपत्र भरण्याचे आवाहन केले.
⚫ *विषयसाधनव्यक्ती श्री.दिपक कोळी सर* यांनी PSM प्रगत शाळांचे 25 निकष, शिष्यवृत्ती परीक्षा पुर्वतयारी, व विविध उपक्रमांचे मार्गदर्शन केले.
⚫ *जि.प.शाळा चारणपाडाचे मुख्याध्यापक श्री.मनोहर चौधरी सर* यांनी वर्ग व शाळा 100% प्रगत केल्याची यशोगाथा, राबविलेल्या उपक्रम व शाळासिद्धी कार्यक्रमाचे PPT द्वारे सादरीकरण केले. सादरीकरणात प्रगत शाळा, डिजीटल शाळा, ज्ञानरचनावादी शाळा असा त्रिवेणी संगम दिसून आला.
⚫*पळासनेर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.बी.के.मोरे सर* यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रगत शाळांना भेटी देणे, शाळा डिजीटल करणे तसेच केंद्रातील सर्व शाळा 100% प्रगत करण्यासाठी आवाहन करुन मार्गदर्शन केले.
⚫ *सांगवी बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री. बी. एस. कोळी साहेब* यांनी सर्व शाळा व शिक्षकांचा आढावा घेऊन वर्ग प्रगत करण्यासाठी तसेच स्थलांतर, गळती रोखण्यासाठी प्रयत्न, प्रेरणासभेचे महत्व, यशोगाथा तसेच PSM GR, 25 निकष, शाळा 100% प्रगत करण्यासाठी मार्गदर्शन केले.
⚫ शिक्षण परिषदेत प्रत्येक शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत डिसेंबर अखेर १००% शाळा प्रगत व डिजीटल करण्याचे आश्वासन दिले. ⚫
▶ *कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.ईश्वर पवार सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.मनोहर चौधरी सर व जि.प.शाळा बाटवा येथील मुख्याध्यापक श्री.दिलीप पाटील सर यांनी केले.*
⭕ ⭕ ⭕ ⭕ ⭕ ⭕ ⭕ ⭕ ⭕
✍ *शब्दांकन*✍
सचिन जडिये
विषयसाधनव्यक्ती
गटसाधन केंद्र, शिरपूर, जि.धुळे
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
प्रचार व प्रसिद्धी
👉 मनाेहर पांडुरंग वाघ
🔵 साधनव्यक्ती 🔵
▶ गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे
📱 9763236070