🎯 *शिक्षण परिषद*
ज्ञानसेवा तु साफल्यम्*
🔴🔴🔴 *विखरण बिट*🔵🔵🔵
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत *●बिट स्तरीय शिक्षण परिषद संपन्न ●* *बिट :- विखरण* स्थळ- जिल्हा परिषद शाळा धर्मराजपाडा.ता. शिरपूर आज दि.17 |12|2016 वार शनिवार रोजी स.ठिक११.वाजता बीट:- विखरण अंतर्गत असलेल्या शाळांची शिक्षण परिषद जिल्हा परीषद शाळा धर्मराजपाडा.येथे सुरू झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. पांडूरंग पाटील माजी मुख्याध्यापक जिल्हा. परीषद शाळा जळोद यांनी केले ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. धर्मराजपाडा शाळेच्या वि.नी ईशस्तवन सादर केले.तदनंतर अध्यक्षीय निवड करण्यात आली.शाळेतील वि. नी. स्वागतगीत सादर केले. सरस्वतीपूजनानंतर सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.100 टक्के डिजीटल शाळा सर्व मुख्याध्यापकांचेही गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.
🌑साधनव्यक्ती श्री,रूपेश देवरेसर यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिक्षण परिषदेचा उद्देश्य सांगितला व तसेच गणित विषय संबोध कार्यशाळेची गरज व महत्त्व सांगितले आणि डिजिटलीकरण बाबात सविस्तर माहिती दिली तसेच Text flash कार्ड या शैक्षणिक साधनांची ओळख करून महत्व पटवून दिले
🌑 धर्मराजपाडा शाळेचे शिक्षक कांबळे सर यांनी झोपडी ते इमारत शाळेचा प्रवास व ज्ञानरचनावादी शाळा अध्यापन पद्धतीने उत्कृष्ट आदर्श शाळेसाठी केलेल्या कार्याचा आढावा सादर केला.
🌑भटाणे केंद्राचे केंद्र प्रमुख *श्री.सूर्यवंशीसर* यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची माहिती दिली.त्या वेळी बोलतांना ते म्हणाले *प्रेरणा व जिद्द* ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर... झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला पळायला लावतात. आणि *पळणार्याला ध्येय गाठायला लावता.
🌑विखरण केंद्राचे केंद्रप्रमुख *श्री भदाणेसर* यांनी संपूर्ण केंद्र डिजिटल झाले.असुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिले. इतरही केंद्रातील शाळा लवकरात लवकर डिजिटल व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रगत शाळांना भेटी देण्याचे नियोजन सांगितले तसेच केंद्रातील सर्व शाळा प्रगत करण्यासाठी मार्गदर्शन केले .तसेच केंद्रप्रमुखांकडून केंद्रातील शाळांचा विविध विषयांवर आढावा, विद्यार्थी गळती थांबवून सर्व शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणणे, टिकवणे व शिकवणे पायाभूत चाचणी विश्लेषण, निष्पत्ती, चर्चा अप्रगत विद्यार्थी व त्यांच्यासाठी नियोजन व कृतिकार्यक्रम, अपेक्षित क्षमतानिहाय व कौशल्य विकसनासाठी नियोजन
शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रत्यक्ष वापर व विद्यार्थ्यांना हाताळू देणे, निसर्गाच्या सानिध्यात नेणे वाचन, लेखन, संभाषण, स्वअभिव्यक्ती, संख्याबोध, संख्यावरील क्रिया या सर्व अपेक्षित क्षमता प्राप्त होणेसाठी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना 100% प्रगत करणे.इ.बाबीवर मार्गदर्शन केले.
🌑साधनव्यक्ती माधवी देसले यांनी
बीटस्तरीय शिक्षण परीषद कार्यक्रम - हेतू, रूपरेषा, नियोजन व अंमलबजावणी
शैक्षणिक मदत (साहाय्य), समुपदेशन, सुलभिकरण, प्रेरणा व ई सहाय्य" या विषयावर मार्गदर्शन केले व ई सहाय्य उपक्रम समजावले. नाविण्यपूर्ण शैक्षणिक Blog ची निर्मिती व Update ठेवणे.याच बरोबर शै.अनुभव कथन व शंका निरसन करून घेतले.
🌑शिक्षण परिषदेत प्रत्येक शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत१००%शाळा प्रगत करु असे आश्वासन दिले.
🔴 श्री घरतसर प्राथमिक शिक्षक जिल्हा. परीषद शाळा जळोद यांनी सर्वांचे आभार मानले अशा प्रकारे विखरण बीट अंतर्गत शिक्षण परिषद पार पडली.....
🖊*शब्दांकन व छायाचित्र*🖊
*श्री.सुरेश सोनवणे.प्राथमिक शिक्षक. जिल्हा परिषद केंद्र शाळा विखरण
ता. शिरपूर जिल्हा धुळे*
🔵👉 प्रसिद्ध व प्रचार 🔴
श्री, मनाेहर पांडुरंग वाघ, साधनव्यक्ती
9763236070
*काही क्षणचित्रे*👇👇
No comments:
Post a Comment