जिल्हा परिषद शाळा जामन्यापाडा (खैर) शैक्षणिक सहल संपन्न

*शैक्षणिक सहल*


*जि. प.शाळा जामन्यापाडा(खैर)* व *जि प शाळा चिखलीपाडा* केंद्र पळासनेर ता. शिरपूर जि धुळे


*स्थळ*- *अनेर धरण-नागेश्वर-सुतगिररणी-विमानतळ तोंदे*


*उपक्रम* विद्यार्थी चे सप्तगुणाचा विकास व विचाराना चालना देणे


*सहल नियोजन व शब्दांकन*-: *कैलास पावरा*


*सहल मंत्रीं* :*विनेश पावरा*


*सांस्कृतिक कार्यक्रम आयोजक*:


*श्री रातीलाल पावरा*


16/12/2016 रोजी *माझी शाळा माझा उपक्रम*व शाळा एक उपक्रम अनेक अंतर्गत *शैक्षणिक सहल*नाविण्य पूर्ण उपक्रम राबविण्यात आला.जि प शाळा जामण्यापाडा  शाळेतील मुख्याध्यापक *श्री.कैलास पावरा* व जि प शाळा चिखलीपाडा शाळेचे मुख्यध्यापक *श्री विनेश पावरा*  सहशिक्षक *रतीलाल पावरा* यांच्या  सहकार्याने *शालेय विद्यार्थ्यांना शिस्त व निसर्ग प्रेमाचे धडे देत. नाविन्य पूर्ण उपक्रम आयोजित केला.

      त्या प्रसंगी काही मुलांचे

*काही क्षण चित्रे*व *मनोगत*👇👇

--------------------

________________________


अनेर धरण


*मनोगत*. ...... अजयचे अनेर धारण वरील मनोगत ...  "बापरे एवढा मोठा धारण मला वाटलं छोटस असेल"


*अंजली* " मला तर माझे आई बाबा मला कुठेच घेऊन जात मला नाही आज सहली मुले मला मोठा रोड , गाड्या ,धरण ,नागेश्वर मंदिर पाहायला मिळाले"..


*प्रवास* प्रथम अनेर धरण वर आमची गाडी पोहचली व

सगळीकडून वेढणार्‍या डोंगर अखंड धरणातील लाटा उमटवणारा वारा... पाहून विद्यार्थी गाडीत बसून जो थकवा आलेला होता तो दूर झाला व विद्यार्थी च्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला. ....धरणा  बद्दल व तेथील जलसाठा बद्दल विनेश पावरा सर यांनी मुलांना माहिती धरणाचे फायदे सांगितले.... नंतर मुलानी आणलेले डब्बे (जेवण) खाल्ले ....


*नागेश्वर* अनेर धरण पाहून झाल्या नंतर वेध लागले ते तीर्थक्षेत्र नागेश्वर कडे .... मुलांच्या मनात अनेक शंका,  प्रश्न होते " सर आत्ता नागेश्वर किती लांब आहे?" ,,,,,  "सर तिथे काय आहे "? असे अनेक प्रश्न होते ....... गाडी नागेश्वर पोहचल्यावर तेथील हिरवड मंदिरात जाणाऱ्या पायऱ्या , तलाव , हनुमान मंदिर , बगीचा  व डोंगर दऱ्या पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मवेनासे झाले.....


*सुतगिररणी* नागेश्वर तीर्थक्षेत्र

  झाल्यावर पुढील प्रवास सुतगिररणी- विमानतळ कडे वडला.... मुलांचे गाडीतच वेगवेगळ्या गमतीजमती सुरूच होत्या  तेवढयात सुटगिररणीत पोहचलो . पोहचल्या वर तेथील सेक्युरिटी इंचार्ज ची परवानगी घेऊन सुतगिररणी पाहणी केली ... मुले अधून- मधून  कंपनीत च वेगवेगळे प्रश्न करत होते ... सर या कापसाचे काय होतो .... दोरे कसे तयार होतात .... एवढे दोऱ्याचे काय करतात ..... असे विविध प्रश्न विचारत होते ..... विद्यार्थी चे सर्व प्रश्न चे निरसन केले..... सरव्या बाबी सांगितल्या.........


रस्त्यात गाडीत बसून मुले....

आम्ही शाळेत बसवलेली सगळी गाणी म्हणून .  नक्कला वगैरे प्रकारांना ऊत येई पर्यंत मजा केली. आमच्या शिक्षकांच्या नक्कला त्यांच्याचसमोर करण्याची ही एकमेव संधी आम्हाला मिळाली. आणि हसून हसून सगळ्यांची पुरेवाट झाली...   परतीचा प्रवास सहलीचे आठवणी घेऊन सुरु झाला ..... *वन्दे मातरम* *भारत माता कि जय* म्हणून आणि दमून भागून झाल्या व शाळेत पोहचलो .....


*विशेष सहकार्य* श्री बी.के.मोरे केंद्रप्रमुख पळासनेर


✍ लेखन ✍

*कैलास पावरा*

जि. प.शाळा जामण्यापाडा(खैर)

प्रचार व प्रसिद्धी

👉 श्री. मनाेहर पांडुरंग वाघ

   🔵साधनव्यक्ती🔴

⭕ गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे

📱⚫ 9763236070


No comments:

Post a Comment