प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत तरडी व हाेळनांथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न



✏प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत तरडी व हाेळनांथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न 

...........................................................................................दिनांक २८ जानेवारी २०१७ राेजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शिक्षण परिषद संपन्न झाल्यात हाेळनांथे बीटातील तरडी ह्या केंद्र अंतर्गत अनुदानित खाजगी आश्रम शाळा अजनाड गांव येथे दुपारी ११ वाजता सुरू झाली सदर परिषदचे उद्घाटन मा.श्री अजमल दादा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितत संपन्न झाले या वेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या जेष्ठअधिव्याख्याता श्रीम. प्रातिभा भावसार मैडम, केंद्र प्रमुख श्री. गाडीलाेहार, तंत्रस्नेही साधनव्यक्ती श्री. मनाेहर वाघ सर, ई शैक्षणिक सहाय्य उपक्रम चे प्रमुख श्री. रूपेश देवरे सर, श्रीम.माधवी देसले, शाळा सिद्धी निर्धारक श्री. मनाेहर चाैधरी सर, सर्व पदोन्नती मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितत शिक्षण परिषदेला सुरूवात झाली. या शैक्षणिक परिषदेत खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले

 विषय:- तंत्रस्नेही शिक्षक व अभ्यासतंत्र 

(मार्गदर्शन विषयतज्ज्ञ :-श्री. मनाेहर वाघ सर,) साधनव्यक्ती, गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे

▶ डिजिटल शाळेत ई लर्निंग साफ्टवेयर च्या सहाय्याने कसे परिणामकारक अध्यापन करता येते याचे सखाेल मार्गदर्शन करण्यात आले.

▶ कमीत कमी खर्चात आपली शाळा डिजिटल कशी करावी व काेण काेणत्या साहित्याचा वापर करावा.

▶ इंटरनेट, गुगल व यु टूब वरील माहिती कशी अध्यापनात वापरावी व कशी डाउनलोड करावी

▶ शैक्षणिक माेबाईल अँप्स चा वापर कसा अध्यापनात करावा.

▶ ई शैक्षणिक साहित्य कसे वापरावे.

▶ आँनलाईन सरल व MDM बाबत आेझरती माहिती दिली.

 विषय:- टेक्स साहित्याचा वापर 

(मार्गदर्शन श्री रूपेश देवरे सर,साधनव्यक्ती )

 पाठय पुस्तकातील चित्राचा वापर लार्ज करून कसा करता येईल.

 विद्यार्थीचे पुर्वज्ञान जागृत करण्यासाठी च्या साेप्या साेप्या ट्रिक्स

 ई शैक्षणिक सहाय्य उपक्रम समजावला

 अतिजलद प्रगत शैक्षणिक कार्यक्रम 

मा. श्रीम.प्रतिभा भावसार मैडम, जेष्ठअधिव्याख्याता, डायट, धुळे यांनी शिरपूर तालुक्यातील सर्व शाळा कशा अतिजलदगतीने प्रगत हाेतील यासाठी मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिले, यावेळी त्याचा मार्गदर्शनाचा लाभ सर्व शिक्षकांनी घेतला.

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

हाेळनांथे केद्रांतील जिल्हा परिषद शाळा पिळाेदा येथे शिक्षण परिषदेते अायाेजन करण्यात आले होते या परिषदेच्या प्रमुख पाहुण्यांनी परिषद छोटी उद्घाटन केले यावेळी हाेळनांथे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री एम.व्ही. देवरे सर हे हाेते या परिषदेचा प्रथम सत्रात स्थानिक शिक्षण प्रेमी माजी मुख्याध्यापक यांचे अनुभव पर मार्गदर्शन झाले नंतर खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले

 विषय :- गणित विषय रंजक पध्दतीने कसा शिकवाल.

(मार्गदर्शन श्री.समाधान धनगर सर,जि.प.शाळा पिळाेदा )

 गणित संबोध कार्यशाळेची परिणामकारकता.

 साेप्या पध्दतीने गणित कसे शिकवाल या बाबत गणितीय साेप्या ट्रिक्स मनाेरंजक पणे समजल्या

 गणितज्ञ यांच्या जीवन प्रवास सांगितला

 विषय :- अभ्यासतंत्र 

मार्गदर्शन :- श्री. रूपेश देवरे सर, साधनव्यक्ती

 आज पर्यंत शिक्षकांना सम्रुद्ध करण्यासाठी विविध प्रकार चे प्रशिक्षण गेल्या १० वर्षात अनेक झालेत त्या माध्यमातून शिक्षक हि सम्रुद्ध झालेत परंतु विद्यार्थी साठी काेणतेही प्रशिक्षण काेणत्याही माध्यमातून दिले नाही, परंतु अभ्यासतंत्र या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी सम्रुद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल असे प्रतिपादन ई सहाय्य उपक्रम चे प्रमुख श्री रूपेश देवरे सर यांनी केले

 विषय :- अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर 

मार्गदर्शन श्री.मनोहर वाघ सर, साधनव्यक्ती

 आज संपुर्ण भारत "डिजिटल इंडिया" चा नारा दिला जात असतांना आपण मागे कसे राहणार?

 "चला हाेऊया तंत्रस्नेही"

 आपल्या अध्यापनात इंटरनेट चा वापर कसा करावा, विविध प्रकार च्या शैक्षणिक माेबाईल अँप्स चा वापर कसा अध्यापनात करावा

 गाेर गरीब विद्यार्थीच्या जीवन आनंद निर्माण करण्यासाठी विविध मनाेरंजक ई साहित्य चा वापर करून घ्यावा

अशा विविध प्रकार च्या शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन व चर्चा सह ह्या शिक्षण परिषद शैक्षणिक वातावरणात वंदेमातरम् नंतर संपन्न झाल्यात

⚫ लेखन व संकलन ⚫

 मनाेहर पांडुरंग वाघ, साधनव्यक्ती

गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे, 9763236070

    


















































प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम साधनव्यक्ती आढावा बैठक संपन्न



विषय साधनव्यक्ती मासिक आढावा बैठक संपन्न

आज दिनांक २० जानेवारी २०१७ राेजी मा.प्राचार्य.डाँ.विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "साधनव्यक्ती ची मासिक आढावा बैठक" घेण्यात आली. धुळे जिल्हयातील सर्व शाळा प्रगत करण्यासाठी एक कृती कार्यक्रम देण्यात आला, यावेळी मा.श्री जे.एस.पाटील (जेष्ठअधिव्याख्याता)श्रीम.जे.टी.पाटील, श्रीम.एस.टी.पाटील,श्रीम.मनिषा देवरे हे उपस्थ आढावा बैठकीतील ठळक मुद्दे 


                                   ⤊ सादरीकरण⤊



▶ विषय साधनव्यक्ती च्या दत्तक शाळाचा व्यक्तीनिष्ठ अहवाल घेण्यात आला.त्यात खालील मुद्दयावर सादरीकरण केले 





  •  वर्ग, शाळा, केंद्रस्तरावर केलेले शैक्षणिक कार्य 

  • साधनव्यक्तीनी दत्तक घेतलेल्या १० शाळा. 

  •  साधनव्यक्ती घेतलेल्या दत्तक शाळापैकी केलेल्या प्रगत शाळा किती

  •  दत्तक घेतलेल्या शाळापैकी अप्रगत असलेल्या शाळा नेमक्या काेणत्या कारणामुळे अप्रगत आहे याचा आढावा घेण्यात आला तसेच साधनव्यक्तीनी काय उपचारात्मक अध्यापन करायला हवे या विषयावर मार्गदर्शन मा.डाँ विद्या पाटील यांनी केले. 

  •  विषय साधनव्यक्तीचे व्यक्तीगत कामकाजाचे सादरीकरण घेण्यात आले. व आपल्या दत्तक शाळेतील विविध प्रकार चे नाविन्यपूर्ण उपक्रमा वरती चर्चा झाली. 

  • KRA वरती भर देणात आला व अप्रगत शाळांवर प्रकाशझोत टाकूण ३१ मार्च २०१७ अखेर सर्व म्हणजे डायट, गट साधनव्यक्ती मिळून धुळे जिल्हयातील सर्व शाळा प्रगत करण्याचा संकल्प केला. 

  •  शाळा प्रगत हाेण्याच्या अगदी जवळ आहेत आशा शाळांकडे लक्ष्य देवून ती शाळा काेणत्या कारणामुळे अप्रगत आहे त्या कारणावर भरदेवून ती शाळा लवकर प्रगत करण्यासाठी मार्गदर्शन केले.

  • आपल्या दत्तक शाळा, केंद्रातील माहिती अध्यायवत ठेवणे. 

  •  साधनव्यक्तीनी नाविन्यपूर्ण उपक्रमांची यादी डायट ला सादर करणे 

  • आपल्या कामाचे PPT, VIDEOS, PHOTO, चे बुकलेट तयार करावे. 

  •  गणित संबोध कार्यशाळेस साधनव्यक्ती शिक्षकांच्या जागी शाळेवर विषयसाधनव्यक्ती शाळेवर अध्यापन करण्याचे नियाेजन करण्यात आले. 



             * अपंग समावेशित शिक्षण *



  • अपंग समावेशित शिक्षण विषयतज्ज्ञ यांनीही अप्रगत शाळा दत्तक घेवून विद्यार्थी व शाळा प्रगत करण्यासाठी शाळाभेटीच कराव्यात अश्या सुचना प्राचार्य मा.डॉ विद्या पाटील यांनी दिल्या. 



           *साधनव्यक्ती चे नाविन्यपूर्ण उपक्रम *



  •  आरंभिक वाचन,लेखन 

  •  चित्र वरून शब्द तयार करणे 

  •  परिसरातील उपलब्ध वस्तु पासून शैक्षणिक साहित्य 

  •  अभ्यासतंत्र 

  •  ई शैक्षणिक सहाय्य 

  •  नेम प्लेट उपक्रम 

  •  शब्द अंताक्षरी 




      * साधनव्यक्ती चे निर्मिती शैक्षणिक साहित्य *



  •  ज्ञानरचनावादी साहित्य 

  • गणित पेटी 

  •  टाकावू वस्तू पासुन शैक्षणिक साहित्य 

  •  टाकावू वस्तू पासुन विज्ञान प्रयोगशाळा 

  • वाचनकार्ड मराठी व गणित या विषयाची 



               * तंत्रस्नेही साधनव्यक्ती *



  •  तंत्रस्नेही साधनव्यक्तीनी तयार केलेले डिजिटल साहित्य 

  •  शिरपूर येथील साधनव्यक्ती मनाेहर वाघ यांनी तयार केलेला शैक्षणिक माहिती देणारा ब्लाँग व धुळे जिल्हयातील एकमेव माेबाईल अँप्स. 

  •  ब्लाँगला आजवर जवळपास ६ महिन्यात १४००० शिक्षण प्रेमी लाेकांनी व शिक्षकांनी भेटी दिल्यात. 

  • गणित संबोध कार्यशाळेची परिणामकारकता 

  •  ज्या शिक्षकांनी आज पर्यंत गणित संबोध कार्यशाळेसाठी नाव नाेंदणी केली नाही अशा शिक्षकांना गणित कार्यशाळेची माहिती द्यावी तसे नियाेजन करावे. 

  •  ज्या शिक्षकांनी गणित संबोध कार्यशाळेत सहभाग नाेंदवला आहे ते शिक्षक गणित अध्यापनाची परिणामकारकता या बाबात साधनव्यक्तीना डायट येथे विचारणा करण्या आली 



   * * अतिजलदगतीने प्रगत शाळा कार्यक्रम * *



  •  ज्या शाळा प्रगत हाेण्याच्या अगदी जवळ आहेत आशा शाळांकडे लक्ष्य केंद्रीत करून अतिजलदगतीने त्या शाळांना प्रगत करण्यासाठी उपचारात्मक पाऊले डायट प्राचार्य ते साधनव्यक्ती सर्व मिळून कार्य करण्याचा संकल्प.

  •  ३१ मार्च २०१७ अखेर सर्व जिल्हयातील शाळा १०० % प्रगत करूयाच 

  • धुळे जिल्हयातील सर्व शाळा १०० % प्रगत करण्यासाठी साठी 


मा. डॉ विद्या पाटील (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे) सह सर्व जेष्ठअधिव्याख्याता,  अधिव्याख्याता,विषयसाधनव्यक्ती व विषयतज्ज्ञ या सर्वांनी प्रमुख्याने शाळाभेटीच कराव्यात अश्या सुचना मा प्राचार्य डॉ विद्या पाटील यांनी दिल्या,

  • ज्या साधनव्यक्ती चे दत्तक केंद्र १०० % प्रगत झाले असतील अशा सर्व साधनव्यक्तीचे अभिनंदन आढावा बैठकीत करण्यात आले       

  • मा.डाँ.विद्या पाटील (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे) व मा श्री. जे.एस.पाटील यांनी प्रगत शाळा करण्यासाठी साठी बहुमाेल असे मार्गदर्शन केले, 

  •  श्री. किशाेर साेनवणे, साधनव्यक्ती यांनी मासिक आढावा बैठक संपन्न झाल्यावर उपस्थितत मा.प्रचार्य डाँ विद्या पाटील, जेष्ठअधिव्याख्याता, अधिव्याख्याता, यांचे आभार मानलेत 


   ** * * *********** DIECPD, DHULE * ****** * * *


  • प्रचार व प्रसिद्धी 





श्री मनाेहर पांडुरंग वाघ, साधनव्यक्ती शिरपूर जिल्हा धुळे
०9763236070

















शाळा एक उपक्रम अनेक

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ध्येयपुर्तींतर्गत*

👇〰〰〰➖〰〰〰👇

*केंद्रस्तरीय शिक्षण परिषद* *केंद्र -विखरण.

विखरण केंद्रात उज्वल भविष्याचा परिघ धारण केलेल्या शैक्षणिक वलयाचा एकमेव केंद्रबिंदू म्हणजे *प्रगत विद्यार्थी*... आणि याच केंद्रबिंदू च्या प्रगतीसाठी  धडाडीने यशोदिद प्रयत्नरत असणार्‍या  *शिक्षणप्रेमी व सामाजिक बांधिलकी जोपासणारे मा.श्री.रघुभाई भरवाड , शा.व्य.समिती अध्यक्ष ; मा.बी.के.देसले.पदोन्नती मुख्याध्यापक; केंद्र प्रमुख साहेब मा.के.व्ही.भदाणे * यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली  *केंद्रस्तरीय शिक्षण परिषद* आणि *शिक्षण परिषदेचे औचित्यसाधून डिजिटल स्कूल परीचय सोहळा जि.प.केंद्रशाळा विखरण येथे*यशस्विपणे पार पडला ..

*स्थळ*                     

🏚 *जिल्हा परिषद केंद्रशाळा विखरण   ता.शिरपूर.जि.धुळे                                         *दिनांक*

🗓 *दि. 21/1/2017                          वार-शनिवार*                               

   ⏱ *वेळ-  सकाळी 11.00 ते सायं. 3.00*

     🌑 *सूत्रसंचालन*🌑

     🙏*श्री .अरविंद सोनवणे*🙏


🌺विद्यादेवता सरस्वती व क्रांतिज्योती सवित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन 🌺

🌹🌹*सांस्कृतिक कलामंच*    *यात आमच्या शाळेतील इयत्ता तिसरी च्या विद्यार्थीनी विविध असे सदाबहार ईशस्तवन सादरीकरण केले.

🔔 *स्वागत गीत-* शाळेच्या विद्यार्थिनीनी सादर केले. 

           *मार्गदर्शन*

मा.के.व्ही.भदाणे. केंद्र प्रमुख यांनी

शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांशी मनमोकळा संवाद केला. तसेच रचनावादावर आधारीत प्रभावी अध्यन अध्यापनाचे फायदे विशद केले.बाल मेळावा घेणे,सांस्कृतिक कार्यक्रम घेणे याविषयी मार्गदर्शन केले .तसेच केद्रांतील सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.व केंद्रातील कामात प्रगती होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन  शिक्षकांचे अभिनंदन केले.तसेच केंद्रातील प्रत्येक शाळा डिजिटल,रचनावादी झाल्याबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच शाळा भेटी दरम्यान ज्या चांगल्या बाबी दिसल्या त्या विषयी शिक्षकाचे कौतुक केले व प्रेरणा दिली.गणित प्रशिक्षणासाठी नोंदणी चा शाळा निहाय आढावा घेतला.सरल प्रणालीचा शाळा निहाय आढावा घेतला.

शिक्षकांनी प्रेरणा घेऊन शाळा विद्यार्थी प्रगत करण्यासाठी सुचना केली.

🔣       *गणित पेटी कार्यशाला*

*श्री.देवरे सर*(विषय तज्ञ),गट साधन केंद्र, शिरपूर

सरांनी गणित पेटीमधील साहित्य कसे वापरावे .गणितातील संबोध या साहित्याद्वारे विद्यार्थ्यांना कसे स्पष्ट करावे,याचे विस्तृत मार्गदर्शन केले .

          --------------------------------------

कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी  सहकार्य केले तसेच केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी उपस्थीत राहून परिषदेची शोभा वाढविली.     

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

      *आयोजक* =*हेमंत नांद्रे*

~~~~~~~~~~~~~~~~ 

*अल्पोपहार**चहापान* = श्रीमती =कल्पना निकम मॅडम., मीनाक्षी पवार मॅडम ; बडगुजर मॅडम ; ठाकरे मॅडम.

                                                                                                                      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

            *आभार* व *वृत्तलेखन*   

  *✍ सुरेश सोनवणे*

*प्राथमिक शिक्षक विखरण*

➖〰〰〰➖〰〰〰➖  

प्रचार व प्रसिद्धी

👉 श्री मनाेहर पांडुरंग वाघ सर

🎯 साधनव्यक्ती, गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे

📱 9763236070


मनाेहर वाघ सर यांच्या Google चा गुगल लाेकल गाईड हा सन्मान बहाल

" Google लाेकल गाईड "

गुगल लेव्हलपर्स कम्युनिटी, इंडिया या गुगल च्या अधिकृत वेबसाइट ने मला " Google लाेकल गाईड "हा सन्मान मला बहाल केला आहे, भारतातील ज्या व्यक्ती गुगल ला डेवेलपमेंट करण्यासाठी मदत करतात त्यांना लेव्हल नंबर एक ते लेव्हल नंबर पाच अशी रँक देते त्यात मला गुगल इंडिया ने सद्या रँक तीन देऊन गुगल लाेकल गाईड हा सन्मान बहाल केला आहे याचे खालील फायदे आहेत,

🔵 गुगल डेव्हलपर्स कमुनिटी चे सभासदत्व

🔴 भारत व जगभरात संपन्न हाेणारे गुगल इव्हेन्टस चे अमंत्रण

🔵 गुगल मँप वरती स्थळ निर्माण व निश्चिती करण्यासाठी मान्यता

🔴 गुगल वरती माेफत गुगल ड्राईव स्वताच्या नावाने

🔵 माेफत गुगल चैनल्स

सध्यातरी येवढया वेनिफीट्स मिळणार आहेत

धन्यवाद!!

@ मनाेहर पांडुरंग वाघ,(गुगल लाेकल गाईड)

साधनव्यक्ती

गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र 📱 9763236070


माझा गुगल लाेकल गाईड चा पत्ता :-

https://maps.google.com/localguides/home?utm_campaign=webapp&utm_source=web&utm_medium=o&utm_term=false&utm_content=Sign_Up_Page_Redesign_3_Cards


BRC SHIRPUR हि एक नाविन्यपूर्ण माेबाईल अँप्स

BRC SHIRPUR माेबाईल अँप्स

⭕धुळे जिल्हयातील एकमेव शैक्षणिक माेबाईल अँप्स चे शानदार उद्घाटन संपन्न ⭕

➡ शिरपूर गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत डिजिटलीकरण करण्या साठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे माेबाईल अँप्स तयार केली असून या अँप्स द्वारा गटातील शिक्षकांना ई सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सदर माेबाईल अँप्स चे शानदार उद्घाटन मा.श्री. डॉ. राजेंद्र महाजन साहेब (संपर्क प्रमुख तथा अधिव्याख्याता, डायट धुळे ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा.श्री.पी.झेड्.रणदिवे साहेब (गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिरपूर ) हाेते या प्रसंगी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, साधनव्यक्ती, माेबाईल टिचर, मुख्याध्यापक, शिक्षक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते,

  सदर माेबाईल अँप्स श्री. मनाेहर पांडुरंग वाघ, साधनव्यक्ती यांनी माेबाईल अँप्स तयार करण्या मागचा उद्देश्य व अँप्स कशी तयार केले व तीचा वापर कसा करावा या बाबत सविस्तर माहिती दिली या वेळी उपस्थितांनी मनाेहर वाघ यांच्या माेबाईल अँप्स चे काैतूक केले,

सुत्रसंचालन :-रुपेश देवरे यांनी केले, यावेळी सचिन जडिये, यांनी अँप्स चा डेमाे दिला,

⭕BRC SHIRPUR माेबाईल अँप्स चे वैशिष्ट्ये⭕


🔵 सम्पूर्ण महाराष्ट्र ची भौगोलिक व प्रशासनिक माहिती.

🔴 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत गुणवत्ता  विकास करण्यासाठी मार्गदर्शन.

🔵 डिजिटलीकरण करण्या साठी मार्गदर्शन.

🔴 सर्व शैक्षणिक शासन निर्णय उपलब्ध.

🔵 ज्ञानरचनावादी अध्यापन.

🔴 अँक्टीव्हिटी बेस लर्निंग व्हिडीओ.

🔵 शैक्षणिक मार्गदर्शन पर PPT प्रेजेन्टेशन.

🔴 लाेकसहभा च्या माध्यमातून शाळाचा विकास CSR.

🔵 विविध प्रकार चे प्रशासनिक प्रपत्र.

🔴 PDF स्वरूपात बाल भारती ची पुस्तक.

🔵 माध्यमिक स्तरीय प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम GR.

🔴 विज्ञान प्रदर्शन.

🔵 खेळाची माहिती, मैदानाची मापे.

🔴 साधनव्यक्ती यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम.

🔵 विषयतज्ज्ञ, फिरते विशेष शिक्षक यांच्या कामाचा व शिवीरांची माहिती.

🔴 गट साधन केंद्र शिरपूर उपक्रम पर फाेटाे अल्बम.

🔵 बाल लायब्रेरी.

🔴 मागेल त्याला प्रशिक्षण (गणित, विज्ञान, तंत्रस्नेही ).

🔵 ई शिष्यवृत्ती.

🔴 ई आधार.

🔵 शालेय पाेषण आहार याेजनेची माहिती.

🔴 ई व्हिडीओ लायब्रेरी.

🔵 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे राबवीत असलेले उपक्रम.

🔴 शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रसिद्धी व प्रचार.

🔵 साधनव्यक्तीनी तयार केलेले शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन.

👉⭕माेबाईल अँप्स निर्माता व लेखन ⭕

✍ श्री. मनाेहर पांडुरंग वाघ

साधनव्यक्ती, गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र

📱 9763236070

ब्लॉग चा पत्ता :- Shirpurbrc.blogspot.com

माेबाईल अँप्स ची लिंक :-  http://www.appsgeyser.com/3801637

🔵🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏 🙏🙏🙏🙏🔵


सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी



सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी 

























































 ** सर्व महिलांचा करूया सन्मान साजरा करूया बालिका दिन ** 



*सावित्रीमाई कोण होत्या?*
================
सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-
• मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय. याप्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरु केले.
• मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका.
• शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) करणाऱ्या, व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ. “अभ्यासक्रम नियोजन” हा विषय आज शिक्षणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो.
• सर्व शैक्षणिक कार्य विनामूल्य करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक. राज्य सरकारने “आनंददायी शिक्षण” ही योजना अलीकडे राबवण्यास घेतली आहे.
• त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली “नेटिव्ह लायब्ररी” काढली होती.
• त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केद्र “नॉर्मल स्कूल” काढले व चालवले होते.
• त्यातून “फातिमा शेख” ही पहिली मुस्लीम शिक्षिका तयार करण्याचे श्रेयसुद्धा सावित्रीबाई व जोतिबा यांना जाते.
• पुणे व आजूबाजूंच्या १८ शाळांचे संचालन करणाऱ्या पहिल्या संचालिका.
• विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणाऱ्या पहिल्या संचालिका.
• सह-शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या शिक्षण-तज्ञ. त्यासाठी वेताळ-पेठेत सह-शिक्षण देणारी शाळा काढली. पण विवाहित महिलांनी मुलांसोबत बसण्यास नकार दिल्याने मुलांची व मुलींची अशा दोन शाळा केल्या.
• शालेय विद्यार्थ्याना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना विद्यावेतन (स्कॉलरशिप) देणे सुरु करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• गरीब घरांतील मुले शाळेत यावीत म्हणून त्यांना खायला देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका. सरकार अलीकडे हा उपक्रम राबवीत आहे.
• प्राथमिक स्तरापासून इंग्रजीचा पुरस्कार करणाऱ्या व राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्याचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या समस्या याविषयी पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पहिल्या समुपदेशक. विकसित देशांत शाळाशाळांत समुपदेशक असणे आवश्यक आहे.
• सरकार तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय अध्यापिका.
• विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घरी विनामूल्य वसतिगृह चालवणारे पहिले दाम्पत्य.
• विधवा स्त्रियांसाठी वसतिगृह काढणारे पहिले दाम्पत्य.
• फुले दाम्पत्त्याने सर्वप्रथम प्रौढांसाठी प्रशिक्षण वर्ग काढले होते. शेतकरी, कामकरी यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा काढल्या होत्या.
• सावित्रीबाई व जोतीराव यांनी आपल्या शाळेत शिकलेल्या धुराजी आप्पाजी चांभार व रानबा महार यांना शिक्षक बनवले होते. याप्रकारे भारतात दलित व्यक्तीना सर्वप्रथम शिक्षक बनविण्याचा मान फुले दाम्पत्यांना मिळतो.
• मारेकरी म्हणून आलेल्या धोंडीराम नामदेव कुंभार याला ब्राह्मणेतरातील पहिला पंडित बनविण्याचा मान फुले दांपत्याकडे जातो.
• आधुनिक, वैज्ञानिक, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या.
• आधुनिक काव्याच्या जनक. (केशवसुतांच्या सुमारे ४० वर्षे आधी आधुनिक शैलीत व पंतकाव्य व संतकाव्य यापेक्षा वेगळ्या आणि जनसामन्यांच्या विविध विषयांवर कवितांचे लेखन.) ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.
• खादीचा पुरस्कार व प्रसार करणाऱ्या पहिल्या सामाजिक नेता.
• अस्पृश्यांना स्वत:च्या घरची पाण्याची विहीर व हौद खुला करून देणारे पहिलेच दाम्पत्य.
• वाट चुकलेल्या विधवांच्या प्रसूतीसाठी व आधारासाठी “बालहत्या-प्रतिबंधक-गृह” सुरु करून चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. भारतातील हा असा पहिलाच प्रयोग होता.
• फुले दाम्पत्याने अनाथ व अवैध संतती म्हणून जन्माला आलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम काढले होते. हा भारतीयांचा अशा प्रकारचा पहिला अनाथाश्रम होता. त्यांच्या मातांसाठी सुद्धा वसतिगृह काढले होते.
• विधवा पुनर्विवाह सभेचे आयोजन व संघटन करणाऱ्या पहिल्या सुधारक.
• विधवा ब्राह्मण स्त्रीचा अनौरस मुलगा दत्तक घेतला. परक्या जातीतील मुलास दत्तक घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
• आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारी समाज सुधारक. स्वत:च्या दत्तक मुलाचा सुद्धा आंतरजातीय विवाह करून दिला होता.
• हुंडाविरहित सामुहिक विवाहाच्या प्रवर्तक.
• रोटीबंदीच्या काळात सर्व जातीय महिलांचे तीळ-गुळासारखे मोठमोठे मेळावे घेणाऱ्या पहिल्या जाती-निर्मूलक.
• मराठीतील पहिली पुस्तक संपादिका आणि प्रकाशिका. महात्मा फुले यांची भाषणे टिपणे काढून संपादित करून प्रकाशित केली.
• विधवांच्या केशवपन (टक्कल करणे) विरोधात न्हाव्यांचा यशस्वी संप घडवून आणला. हा भारतातील पहिला यशस्वी संप होता.
• त्या प्रभावी वक्ता होत्या. सत्यशोधक समाजाच्या व इतर कार्यक्रमांत त्यांनी बरीच भाषणे दिली होती.
• पतीच्या अंत्ययात्रेत स्वत: टिटवे घेऊन जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
• पतीच्या चितेला अग्नी देऊन सर्व अंत्यसंस्कार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
• सत्याशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्ष.
• १८९६ साली दुष्काळात पोटासाठी शरीरविक्रय करणार्याय बायांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईंनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
• १८९६ साली दुष्काळात सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडून दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार हमीसारखी दुष्काळी कामे सरकाराला सुरु करण्यास भाग पाडले.
• १८७६ च्या दुष्काळात उपासमार झेलणाऱ्या हजारो मुलांसाठी मातृप्रेमाने ५२ अन्नछत्रे चालवणारी एकमेव माता. १८९६ च्या दुष्काळातही अशी अन्नछत्रे चालविली.
• बहुजनांची चळवळ चालविणाऱ्या पहिल्या महिला पुढारी.
• भारतीय महिला मुक्ती व महिला सबलीकरण आंदोलनाच्या पहिल्या नेत्या.
संदर्भ:- “सावित्रीमाई कोण होत्या?”


चला करून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र,केंद्र वाठाेडे

⛳प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंंतर्गत


🌼केंद्र स्तरीय शिक्षण परिषद 🌼

केंद्र --वाठोडे दि.३१/१२/२०१६--वार-शनिवार.

स्थळ--केंद्रशाळा-वाठोडे ता.शिरपुर जि.धुळे,

👥उपस्थिती--शि.वि.अ.मा.डॉ .नीता सोनवणे मॕडम,

केंद्र प्रमुख मा.श्री.आर.पी.कोळीसर ,विषयसाधनव्यक्ति श्रीम.मुडावदकर ,वाठोडे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद..

💥आज दि.३१/१२/२०१६ वार शनिवार रोजी सकाळी ११.०० वाजता वाठोडे केंद्रातर्गत असलेल्या  शाळांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जि.प.केंद्र शाळा वाठोडे येथे घेण्यात  आली.ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.वाठोडे शाळेतीलविद्यार्थ्यीनींनी ईशस्तवन सादर केले .अध्यक्षीय निवड करण्यात  आली.त्यानंतर स्वागतगीत सादर केले .सरस्वतीपुजनानंतर सर्व  मान्यवरांचे श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

🌹वाठोडे केंद्र १००%डिजीटल झाले याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

🍁श्री. गणेश सोनवणे सर यांनी  गणितपेटी विषयी मार्गदर्शन केले.व संबोध स्पष्ट केले.

🌸केंद्रातील शिक्षकांनी आपल्या शाळेतील नविन सुधारणा व उपक्रम याविषयी अनुभव सांगितले ते पुढीलप्रमाणे ----

🎪जि.प.शाळा -वाठोडे--(श्री.कुवर सर)-शाळेत राष्ट्रीयगीत बँण्डवर घेतले जाते,वि.ना बँण्ड वाजविता येतो ,दर शनिवारी कवायत बँण्डवर घेतली जाते

🎪जि.प.शाळा कुंभारटेक--(श्री पावरा सर)--परिपाठाच्यावेळी विद्यार्थ्याचे वाचन घेतले जाते,वाचताना वि.ना कोठे अडचणी येतात यावर लक्ष देऊन त्यावर मार्गदर्शन केले जाते .

🎪जि.प.शाळा थाळनेर(श्री वाडीले सर)--शाळा डिजीटल झाली,हँण्डवाॕश स्टेशन बनविले ,शाळेच्या संरक्षण भिंतीवर काचा लावल्या ,शाळेत टीव्ही आल्यामुळे उपस्थिती वाढली.

🎪जि.प.शाळा भोरटेक(श्री.राजपुत सर)--गणित विषयावर मार्गदर्शन केले ,शाळेत डिजीटल क्लासारुम तयार केला,त्यामुळे वि.ची उपस्थिती वाढली ,ज्ञानरचनावाद यावर आधारित अध्यापन केले जाते.

🎪जि.प.शाळा दामसरपाडा--(श्री सावळे सर)--इ.२रीव३री च्या वि.ना गणित संबोध स्पष्ट केल्या मुळे वि.ना गणित विषय सोपा वाटु लागला ,वि.ना चित्रावरून गोष्ट सांगू लागतात,नेहा नावची मुलगी शब्दांवरुन गोष्ट सांगू शकते,गणितामुळे भाषा कडे दुर्लक्ष व्हायला नको,अशी त्यांनी खंत व्यक्त केली.

🎪जि.प.थाळनेरउर्दु (नाविद सर)--गणितपेटी सोबत विज्ञान पेटी चा विचार केला जावा,उच्च प्राथमिक शाळा साठी उपयोग केला जातो ,इंटरनेट सुविधा मुळे वि.ना अभ्यासक्रम सोपे वाटते.

🎪जि.प.शाळा जमादारपाडा--(श्री.खेडकर सर)--वि.चा वाचनाचा सराव केला जातो,

🎪जि.प.शाळा नवाडीपाडा--(श्री गावित सर)--शाळेत परिपाठ हा संगितमय वातावरणात घेतला जातो ,वि.लेझीम खेळतात,वि.चा अभ्यास दररोज तपासला जातो,खेळ खेळायला दिले जातात,मातीचे भांडी बनवितात ,शाळेत रांगोळी स्पर्धा ,हस्ताक्षर स्पर्धा घेतली  जाते त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत झाली .

🍁.शि.वि.अ.मा.डाँ.नीता सोनवणे मँडम यांनी सर्व प्रथम उपस्थित सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांना नवीन  वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व वाठोडे केंद्र डिजीटल झाल्याने सर्वाचे अभिनंदन केले सर्व शाळा व शिक्षक यांचा आढावा घेतला व मार्गदर्शनास सुरूवात केली .गुणवत्ता वाढ करण्यासाठी व १००% विद्यार्थी प्रगत करण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे . जुन २०१७मध्ये नमुना नं.१ व L,C,शासन निर्णयप्रमाणे नवीन नमुन्यात भरणे.रेकॉर्ड पुर्ण करणे .पुस्तकाचा वापर ग्रंथालयासाठी करणे ,अडगळीत पडलेले साहित्य बाहेर काढणे व त्याचा योग्य वापर करणे ,शालेय स्वच्छता व विद्यार्थी स्वच्छता याकडे अधिक लक्ष देणे.अशाप्रकारे  विविध विषयांवर मार्गदर्शन  केले .

💥श्रीम.मुडावदकर विषयसाधनव्यक्ती यांनी PSM प्रगत शाळेचे २५ निकष व गणित संबोध कार्य शाळेची गरज व महत्त्व स्पष्ट करून सर्व शिक्षकांना गणित प्रशिक्षणाचे online मागणी प्रपत्र भरण्याचे आवाहन केले .

💥    शिक्षण परिषदेत प्रत्येक शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला .शाळा १००%प्रगत करण्याचे आश्वासन  दिले.

💥कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री .कुवर सर यांनी  केले

✍शब्दांकन✍

श्रीमती मुडावदकर पी.डी.

विषयसाधनव्यक्ती

बी.आर.सी.शिरपूर,जि.धुळे.

🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾

⭕⭕⭕⭕ प्रचार व प्रसिद्धी ⭕⭕⭕⭕

🔵 मनाेहर पांडुरंग वाघ 🔵

साधनव्यक्ती, गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे

📱9763236070