प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत तरडी व हाेळनांथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न



✏प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत तरडी व हाेळनांथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न 

...........................................................................................दिनांक २८ जानेवारी २०१७ राेजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शिक्षण परिषद संपन्न झाल्यात हाेळनांथे बीटातील तरडी ह्या केंद्र अंतर्गत अनुदानित खाजगी आश्रम शाळा अजनाड गांव येथे दुपारी ११ वाजता सुरू झाली सदर परिषदचे उद्घाटन मा.श्री अजमल दादा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितत संपन्न झाले या वेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या जेष्ठअधिव्याख्याता श्रीम. प्रातिभा भावसार मैडम, केंद्र प्रमुख श्री. गाडीलाेहार, तंत्रस्नेही साधनव्यक्ती श्री. मनाेहर वाघ सर, ई शैक्षणिक सहाय्य उपक्रम चे प्रमुख श्री. रूपेश देवरे सर, श्रीम.माधवी देसले, शाळा सिद्धी निर्धारक श्री. मनाेहर चाैधरी सर, सर्व पदोन्नती मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितत शिक्षण परिषदेला सुरूवात झाली. या शैक्षणिक परिषदेत खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले

 विषय:- तंत्रस्नेही शिक्षक व अभ्यासतंत्र 

(मार्गदर्शन विषयतज्ज्ञ :-श्री. मनाेहर वाघ सर,) साधनव्यक्ती, गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे

▶ डिजिटल शाळेत ई लर्निंग साफ्टवेयर च्या सहाय्याने कसे परिणामकारक अध्यापन करता येते याचे सखाेल मार्गदर्शन करण्यात आले.

▶ कमीत कमी खर्चात आपली शाळा डिजिटल कशी करावी व काेण काेणत्या साहित्याचा वापर करावा.

▶ इंटरनेट, गुगल व यु टूब वरील माहिती कशी अध्यापनात वापरावी व कशी डाउनलोड करावी

▶ शैक्षणिक माेबाईल अँप्स चा वापर कसा अध्यापनात करावा.

▶ ई शैक्षणिक साहित्य कसे वापरावे.

▶ आँनलाईन सरल व MDM बाबत आेझरती माहिती दिली.

 विषय:- टेक्स साहित्याचा वापर 

(मार्गदर्शन श्री रूपेश देवरे सर,साधनव्यक्ती )

 पाठय पुस्तकातील चित्राचा वापर लार्ज करून कसा करता येईल.

 विद्यार्थीचे पुर्वज्ञान जागृत करण्यासाठी च्या साेप्या साेप्या ट्रिक्स

 ई शैक्षणिक सहाय्य उपक्रम समजावला

 अतिजलद प्रगत शैक्षणिक कार्यक्रम 

मा. श्रीम.प्रतिभा भावसार मैडम, जेष्ठअधिव्याख्याता, डायट, धुळे यांनी शिरपूर तालुक्यातील सर्व शाळा कशा अतिजलदगतीने प्रगत हाेतील यासाठी मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिले, यावेळी त्याचा मार्गदर्शनाचा लाभ सर्व शिक्षकांनी घेतला.

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

हाेळनांथे केद्रांतील जिल्हा परिषद शाळा पिळाेदा येथे शिक्षण परिषदेते अायाेजन करण्यात आले होते या परिषदेच्या प्रमुख पाहुण्यांनी परिषद छोटी उद्घाटन केले यावेळी हाेळनांथे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री एम.व्ही. देवरे सर हे हाेते या परिषदेचा प्रथम सत्रात स्थानिक शिक्षण प्रेमी माजी मुख्याध्यापक यांचे अनुभव पर मार्गदर्शन झाले नंतर खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले

 विषय :- गणित विषय रंजक पध्दतीने कसा शिकवाल.

(मार्गदर्शन श्री.समाधान धनगर सर,जि.प.शाळा पिळाेदा )

 गणित संबोध कार्यशाळेची परिणामकारकता.

 साेप्या पध्दतीने गणित कसे शिकवाल या बाबत गणितीय साेप्या ट्रिक्स मनाेरंजक पणे समजल्या

 गणितज्ञ यांच्या जीवन प्रवास सांगितला

 विषय :- अभ्यासतंत्र 

मार्गदर्शन :- श्री. रूपेश देवरे सर, साधनव्यक्ती

 आज पर्यंत शिक्षकांना सम्रुद्ध करण्यासाठी विविध प्रकार चे प्रशिक्षण गेल्या १० वर्षात अनेक झालेत त्या माध्यमातून शिक्षक हि सम्रुद्ध झालेत परंतु विद्यार्थी साठी काेणतेही प्रशिक्षण काेणत्याही माध्यमातून दिले नाही, परंतु अभ्यासतंत्र या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी सम्रुद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल असे प्रतिपादन ई सहाय्य उपक्रम चे प्रमुख श्री रूपेश देवरे सर यांनी केले

 विषय :- अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर 

मार्गदर्शन श्री.मनोहर वाघ सर, साधनव्यक्ती

 आज संपुर्ण भारत "डिजिटल इंडिया" चा नारा दिला जात असतांना आपण मागे कसे राहणार?

 "चला हाेऊया तंत्रस्नेही"

 आपल्या अध्यापनात इंटरनेट चा वापर कसा करावा, विविध प्रकार च्या शैक्षणिक माेबाईल अँप्स चा वापर कसा अध्यापनात करावा

 गाेर गरीब विद्यार्थीच्या जीवन आनंद निर्माण करण्यासाठी विविध मनाेरंजक ई साहित्य चा वापर करून घ्यावा

अशा विविध प्रकार च्या शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन व चर्चा सह ह्या शिक्षण परिषद शैक्षणिक वातावरणात वंदेमातरम् नंतर संपन्न झाल्यात

⚫ लेखन व संकलन ⚫

 मनाेहर पांडुरंग वाघ, साधनव्यक्ती

गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे, 9763236070

    


















































No comments:

Post a Comment