विषय साधनव्यक्ती मासिक आढावा बैठक संपन्न
आज दिनांक २० जानेवारी २०१७ राेजी मा.प्राचार्य.डाँ.विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "साधनव्यक्ती ची मासिक आढावा बैठक" घेण्यात आली. धुळे जिल्हयातील सर्व शाळा प्रगत करण्यासाठी एक कृती कार्यक्रम देण्यात आला, यावेळी मा.श्री जे.एस.पाटील (जेष्ठअधिव्याख्याता)श्रीम.जे.टी.पाटील, श्रीम.एस.टी.पाटील,श्रीम.मनिषा देवरे हे उपस्थ आढावा बैठकीतील ठळक मुद्दे
⤊ सादरीकरण⤊
▶ विषय साधनव्यक्ती च्या दत्तक शाळाचा व्यक्तीनिष्ठ अहवाल घेण्यात आला.त्यात खालील मुद्दयावर सादरीकरण केले
- वर्ग, शाळा, केंद्रस्तरावर केलेले शैक्षणिक कार्य
- साधनव्यक्तीनी दत्तक घेतलेल्या १० शाळा.
- साधनव्यक्ती घेतलेल्या दत्तक शाळापैकी केलेल्या प्रगत शाळा किती
- दत्तक घेतलेल्या शाळापैकी अप्रगत असलेल्या शाळा नेमक्या काेणत्या कारणामुळे अप्रगत आहे याचा आढावा घेण्यात आला तसेच साधनव्यक्तीनी काय उपचारात्मक अध्यापन करायला हवे या विषयावर मार्गदर्शन मा.डाँ विद्या पाटील यांनी केले.
- विषय साधनव्यक्तीचे व्यक्तीगत कामकाजाचे सादरीकरण घेण्यात आले. व आपल्या दत्तक शाळेतील विविध प्रकार चे नाविन्यपूर्ण उपक्रमा वरती चर्चा झाली.
- KRA वरती भर देणात आला व अप्रगत शाळांवर प्रकाशझोत टाकूण ३१ मार्च २०१७ अखेर सर्व म्हणजे डायट, गट साधनव्यक्ती मिळून धुळे जिल्हयातील सर्व शाळा प्रगत करण्याचा संकल्प केला.
- शाळा प्रगत हाेण्याच्या अगदी जवळ आहेत आशा शाळांकडे लक्ष्य देवून ती शाळा काेणत्या कारणामुळे अप्रगत आहे त्या कारणावर भरदेवून ती शाळा लवकर प्रगत करण्यासाठी मार्गदर्शन केले.
- आपल्या दत्तक शाळा, केंद्रातील माहिती अध्यायवत ठेवणे.
- साधनव्यक्तीनी नाविन्यपूर्ण उपक्रमांची यादी डायट ला सादर करणे
- आपल्या कामाचे PPT, VIDEOS, PHOTO, चे बुकलेट तयार करावे.
- गणित संबोध कार्यशाळेस साधनव्यक्ती शिक्षकांच्या जागी शाळेवर विषयसाधनव्यक्ती शाळेवर अध्यापन करण्याचे नियाेजन करण्यात आले.
* अपंग समावेशित शिक्षण *
- अपंग समावेशित शिक्षण विषयतज्ज्ञ यांनीही अप्रगत शाळा दत्तक घेवून विद्यार्थी व शाळा प्रगत करण्यासाठी शाळाभेटीच कराव्यात अश्या सुचना प्राचार्य मा.डॉ विद्या पाटील यांनी दिल्या.
*साधनव्यक्ती चे नाविन्यपूर्ण उपक्रम *
- आरंभिक वाचन,लेखन
- चित्र वरून शब्द तयार करणे
- परिसरातील उपलब्ध वस्तु पासून शैक्षणिक साहित्य
- अभ्यासतंत्र
- ई शैक्षणिक सहाय्य
- नेम प्लेट उपक्रम
- शब्द अंताक्षरी
* साधनव्यक्ती चे निर्मिती शैक्षणिक साहित्य *
- ज्ञानरचनावादी साहित्य
- गणित पेटी
- टाकावू वस्तू पासुन शैक्षणिक साहित्य
- टाकावू वस्तू पासुन विज्ञान प्रयोगशाळा
- वाचनकार्ड मराठी व गणित या विषयाची
* तंत्रस्नेही साधनव्यक्ती *
- तंत्रस्नेही साधनव्यक्तीनी तयार केलेले डिजिटल साहित्य
- शिरपूर येथील साधनव्यक्ती मनाेहर वाघ यांनी तयार केलेला शैक्षणिक माहिती देणारा ब्लाँग व धुळे जिल्हयातील एकमेव माेबाईल अँप्स.
- ब्लाँगला आजवर जवळपास ६ महिन्यात १४००० शिक्षण प्रेमी लाेकांनी व शिक्षकांनी भेटी दिल्यात.
- गणित संबोध कार्यशाळेची परिणामकारकता
- ज्या शिक्षकांनी आज पर्यंत गणित संबोध कार्यशाळेसाठी नाव नाेंदणी केली नाही अशा शिक्षकांना गणित कार्यशाळेची माहिती द्यावी तसे नियाेजन करावे.
- ज्या शिक्षकांनी गणित संबोध कार्यशाळेत सहभाग नाेंदवला आहे ते शिक्षक गणित अध्यापनाची परिणामकारकता या बाबात साधनव्यक्तीना डायट येथे विचारणा करण्या आली
* * अतिजलदगतीने प्रगत शाळा कार्यक्रम * *
- ज्या शाळा प्रगत हाेण्याच्या अगदी जवळ आहेत आशा शाळांकडे लक्ष्य केंद्रीत करून अतिजलदगतीने त्या शाळांना प्रगत करण्यासाठी उपचारात्मक पाऊले डायट प्राचार्य ते साधनव्यक्ती सर्व मिळून कार्य करण्याचा संकल्प.
- ३१ मार्च २०१७ अखेर सर्व जिल्हयातील शाळा १०० % प्रगत करूयाच
- धुळे जिल्हयातील सर्व शाळा १०० % प्रगत करण्यासाठी साठी
मा. डॉ विद्या पाटील (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे) सह सर्व जेष्ठअधिव्याख्याता, अधिव्याख्याता,विषयसाधनव्यक्ती व विषयतज्ज्ञ या सर्वांनी प्रमुख्याने शाळाभेटीच कराव्यात अश्या सुचना मा प्राचार्य डॉ विद्या पाटील यांनी दिल्या,
- ज्या साधनव्यक्ती चे दत्तक केंद्र १०० % प्रगत झाले असतील अशा सर्व साधनव्यक्तीचे अभिनंदन आढावा बैठकीत करण्यात आले
- मा.डाँ.विद्या पाटील (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे) व मा श्री. जे.एस.पाटील यांनी प्रगत शाळा करण्यासाठी साठी बहुमाेल असे मार्गदर्शन केले,
- श्री. किशाेर साेनवणे, साधनव्यक्ती यांनी मासिक आढावा बैठक संपन्न झाल्यावर उपस्थितत मा.प्रचार्य डाँ विद्या पाटील, जेष्ठअधिव्याख्याता, अधिव्याख्याता, यांचे आभार मानलेत
** * * *********** DIECPD, DHULE * ****** * * *
- प्रचार व प्रसिद्धी
श्री मनाेहर पांडुरंग वाघ, साधनव्यक्ती शिरपूर जिल्हा धुळे
०9763236070
No comments:
Post a Comment