दहिवद केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न झाली

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ●केंद्र स्तरीय शिक्षण परिषद संपन्न ● केंद्र :- दहिवद स्थळ- नुतन माध्यमिक विद्यालय दहिवद ता शिरपूर आज दि.३|१२|२०१६रोजी वार शनिवार स.ठिक११.३०वाजता केंद्र:- दहिवद अंतर्गत असलेल्या शाळांची शिक्षण परिषद नुतन माध्यमिक विद्यालय दहिवद येथे सुरू झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम,पाटील मैडम यांनी केले ईशस्तवनने कार्यक्रमाची सुरूवात झाली.दहिवद शाळेच्या वि.नी ईशस्तवन सादर केले. अध्यक्षीय निवड करण्यात आली. त्यानंतर वि नी स्वागतगीत सादर केले. सरस्वतीपूजनानंतर सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले

🌑साधनव्यक्ती श्री,मनाेहर पांडुरंग वाघ सर यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिक्षण परिषदेचा उद्देश्य सांगितला व तसेच गणित विषय संबोध कार्यशाळेची गरज व महत्त्व सांगितले तसेच डिजिटलीकरण बाबात सविस्तर माहिती दिली

🌑 मुकेश पटेल मिल्ट्री स्कुलचे शाळेचे बाविस्कर सर यांनी इ ६ ली च्या गणित विषया चा ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीने उत्कृष्ट आदर्श पाठाचे सादरीकरण केले

🌑शिक्षण विस्तार अधिकारी श्री साळुंखे साहेब यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम ची माहिती दिली

🌑दहिवद केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ताेरवणे यांनी संपूर्ण केंद्र डिजिटल व्हावे यासाठी मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिले. इतरही शाळा लवकरात लवकर डिजिटल व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रगत शाळांना भेटी देण्याचे नियोजन सांगितले तसेच केंद्रातील सर्व शाळा प्रगत करण्यासाठी मार्गदर्शन केले

🌑शिक्षण परिषदेत प्रत्येक शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत१००%शाळा प्रगत करु असे आश्वासन दिले.

🔴 साधनव्यक्ती श्री रुपेश देवरे यांनी "ई सहाय्य" या विषयावर मार्गदर्शन केले व ई सहाय्य उपक्रम समजावले नूतन माध्यमिक विद्यालय दहिवद येथील मुख्याध्यापक श्री शेखर सर यांनी सर्वांचे आभार मानले अश्या प्रकारे दहिवद केंद्रातील पहिली शिक्षण परिषद पार पडली.....

... 🖋🖋शब्दांकन🖋

श्रीम.मुडावदकर प्रमिला डाेंगरराव

साधनव्यक्ती, गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे


No comments:

Post a Comment