*वेध वनभोजनाचे*
*उपक्रम धारा*
💃💃💃💃💃💃💃💃 *शाळा एक उपक्रम अनेक*
👫👬👬👭👫👬अं👭 *संकलन*---- अरविंद सोनवणे. *शब्दांकन*--- सूरेश सोनवणे.
*आयोजक*तथा *सहल मंत्रीं . *हेमंत नांद्रे*
*सांस्कृतिक कार्यक्रम आयोजक*
*श्रीमती -मीनाक्षी पवार मॅडम्.
*श्रीमती-निकम मॅडम्.
*श्रीमती-बडगूजर मॅडम्.
*श्रीमती-ठाकरे मॅडम्.
*जिल्हा परिषद केंद्र शाळा विखरण येथे आज दिनांक 21/9/2016 रोजी*माझी शाळा माझा उपक्रम*अंतर्गत शाळा एक उपक्रम अनेक अंतर्गत *वनभोजनाचा*नाविण्य पूर्ण उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील *उपक्रमशील मुख्याध्यापक* श्री. बी.के.देसले (दादा) सहशिक्षक . व शिक्षिका यांच्या सहकार्याने *शालेय विद्यार्थ्यांना शिस्त व निसर्ग प्रेमाचे धडे देत. नाविन्य पूर्ण उपक्रम आयोजित केला.
त्या प्रसंगी, केंद्राचे केंद्र प्रमुख भदाणे बापू ,तसेच भटाणे केंद्राचे केंद्र प्रमुख सूर्यवंशी दादा व सहकारी बंधू-भगिनि उपस्थित होते.
*काही क्षण चित्रे*व *मनोगत*(एका विद्यार्थ्यांचे)👇👇
----------------------------------------
*वेध वनभोजनाचे*
___________________________
मनोगत. ......ललितचे...
हवेतील गारवा, सगळीकडे,अजूनही असलेली हिरवळ, शेतात वार्याच्या लयीवर हलणारी गहू, हरभरा, ज्वारी, मका, यांची चिमुकली रोपं, खळाळत वाहणारे ओढे आणि गावाला सगळीकडून वेढणार्या डोंगरांवर वाढलेल्या कमरेइतक्या गवतावर अखंड लाटा उमटवणारा वारा... या सगळ्यांमुळे हे दिवस संपूच नयेत असं वाटतं. पावसाच्या पाण्यावर येणार्या पिकांची सुगी पाहून या दिवसांतच - खरेतर पावसाळ्यातल्या पिकांबरोबरच मुद्दाम या दिवसांची मजा चाखायला मागे रेंगाळणारी पीकं आपल्या हिरव्यागार पसरट पानांनी आणि पांढर्या शुभ्र फुलोर्याने शेताचा बांध न् बांध सज्ज झालेला पाहून आमच्या शाळेत पुन्हा एक उत्साह भरून आला आणि मूलांना निराळेच वेध लागले. ते वनभोजनाचे !
सगळीकडून जुळून आलेले निसर्गाचे रूप पाहून गुरुजींच्या मागे मुलांची पिरपिर सुरू झाली- "गुरुजी वनभोजन!" "गुरुजी वनभोजन!" "गुरुजी हो.....हो......मग केव्हा जायचे वनभोजनाला?".. गुरुजींच्या मागे हा धोशा लागला.आणी आमच्या शाळेचा वनभोजनाचा दिवस पक्का झाला. तो एका पूर्ण दिवसाचा कार्यक्रम ठरला.
वनभोजनाच्या दिवशी अगदी अंथरुणातून उठल्यापासून मुले वेगळ्याच जगात तरंगत होते. त्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या घरातून भाकरी, पोळी, भाजी ,चटणी-मीठ इ. घेऊन शाळेच्या गणवेषात नेहमीच्या वेळेआधी शाळेत हजर झाले ! शाळेत आल्यावर, वनभोजनाला लागणार्या सामानाची बांधाबांध सुरू झाली. दोन मोठेच्या मोठे टोप, तेवढीच मोठी उलताणी, आणखी दोन जरा लहान टोप, मोठ्या पळ्या(डाव), बादली-बादली ग्लास आणि स्वयंपाकासाठी साहित्य
ही सगळी तयारी झाल्यावर मग शाळेतल्या वार्ताफलकावर मोठ्या झोकात 'वनभोजन' असे लिहून त्याखाली आम्ही वनभोजनाला कुठे जाणार आहोत त्या ठिकाणाचे नाव भिजवलेल्या रंगीत खडूने लिहिले .आणि प्रार्थना म्हणून झाल्यावर दोघादोघांच्या जोड्या करून रांगेत आमची सेनेने त्या दिशेने कूच केले. सोबतीला बेंबीच्या देठापासून दिलेल्या साक्षरता, स्वातंत्र्य, देशभक्त यांच्यावरच्या घोषणा!
तिथे पोहोचेपर्यंत ऊन चांगलेच वर आलेले होते. आमचा तळ एक विहिरीजवळ दाट सावलीच्या मोठ्या झाडाखाली ठोकला. मग आपल्या पिशव्या ठेऊन थोडे हाशहूश करून पुढच्या तयारीला लागलो. सगळ्यात आधी चुलीसाठी योग्य आकाराचे दगड शोधून आणाले. वार्याची दिशा बघून गुरुजींनी त्या दगडांच्या पाहिजे तेवढ्या उंचीच्या तीन मोठ्या चुली मांडल्या. (या चुली घरातल्या नेहमीच्या नाजूक, नक्षीदार आणि सारवून निगा राखलेल्या चुलींच्या पुढे अगदीच रांगड्या आणि ओबडधोबड वाटूलागल्या. म्हणून त्यांना तसलेच रांगडे आणि ओबडधोबड नाव-चुलवण!)
त्यानंतरचे काम म्हणजे सरपण जमवायचे. सोबत आणलेले तांदूळ आणि भाज्यांची वेगवेगळे ढीग करून महिलामंडळ त्याची नीटवाट करायला लागले. आणि आम्ही झाडांच्या वाळलेल्या फांद्या, वाळलेले शेण, काटक्या हे सगळे गोळा करण्यासाठी चारी दिशेला पांगलो.
तोपर्यंत गुरुजींनी आणलेले मोठे टोप घासून त्यांना बाहेरून मातीचा पातळ लेप लावून घेतले. (म्हणजे टोप जाळाने काळे होत नाहीत आणि पुन्हा स्वच्छ करायला सोपे पडते.)
ही सगळी व्यवस्था झाल्यावर बरीच खटपट करून ती चुलवणं पेटवली . तांदूळ धुवून शिजायला टाकले आणि त्यानंतर या वनभोजनाच्या केंद्रस्थानी असलेल्या मेनूला फोडणी दिली ! तोपर्यंत आमच्या पोटात कावकाव सुरू व्हायला लागली. मग हे 'भोजन' शिजेपर्यंत झाडाखाली बसून आम्ही शाळेत बसवलेली सगळी गाणी म्हणून . (जागेवर बसूनच:-) नक्कला वगैरे प्रकारांना ऊत येई पर्यंत मजा केली. आमच्या शिक्षकांच्या नक्कला त्यांच्याचसमोर करण्याची ही एकमेव संधी आम्हाला मिळाली. आणि हसून हसून सगळ्यांची पुरेवाट झाली.
एव्हाना भाताचा आणि त्या शिजत आलेल्या कालवणाचा सुगंध जोरजोरात त्या जाळाच्या धगीसह आमच्यापर्यंत येऊ लागला आणि आमच्या माना पुन्हा पुन्हा त्या चुलवणांकडे वळायच्या. आयशप्पथ! भूक कसली खवळून उठायची! ..भात आणि कालवण शिजल्यावर वाढपे-पाणके नेमले आणि मग आपापल्या थाळ्या आणि तांब्यांचा ठणाणा करत आमची एकच एक गोलाकार पंगत पडली.
सोबत दुमडून बांधून आणलेल्या भाकरीचे आतापर्यंत उन्हामुळे तुकडे झालेले . ती भाकरी, थाळीतच वाढलेले ते वाफाळते कालवण, वाट्टेल तसे वेडेवाकडे फोडलेल्या कांद्याचे तुकडे आणि अजून पाणीसुद्धा नीट न मुरलेला तो गरम गरम भात... अहाहा! त्या वनभोजनातला तो अक्षरश: परमोच्च बिंदूच ! या मोठ्या पंगतीनंतर वाढपे-पाणके आणि गुरुजींची एक छोटी पंगत बसली. त्यानंतर सगळी भांडी स्वच्छ करून मग शिक्षकांसहीत आम्ही सगळे कबड्डी, खोखो खेळलो. एक दोन वाजायला आल्यावर मग परत दोघादोघांच्या रांगा करून आम्ही शाळेत परतलो. तिथे वन्दे मातरम् म्हणून आणि दमून भागून आपापल्या घरी जायला निघालो......
@ प्रसिद्ध व प्रचार @
श्री. मनाेहर पांडुरंग वाघ,
साधनव्यक्ती, गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जि.धुळे, (तंत्रस्नेही अँडमिन पँनल, महाराष्ट्र)
9763236070 ✍ 8275589966
Khupach Sundar Asa upakram hota...
ReplyDeleteVikharan Z.P. Marathi shaleche Abhinandan...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
ReplyDelete