नवीन MDM Mobile APP डाउनलोड करा



शालये पोषण आहार योजना ची नवीन MDM Mobile APP डाउनलोड करा 





डाउनलोड करण्या साठी फोटो वरती क्लिक करा 










Notice



MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP shirpurbrc.blogspot.in वरून   download करुन Mobile मध्ये Install करावे. 




Notice







BACKDATED DATA ENTRY CLOSED FROM 31 AUG 2016. ALL MOBILE APP USERS SHOULD BE DOWNLOAD THE NEW VERSION OF MOBILE APP FROM WEBSITE HAVING FACILITY OF STOCK INWARD.







** सविस्तर माहिती साठी खालील संकेतस्थळी भेट द्या  ** 


https://education.maharashtra.gov.in 



शालेय पोषण आहार योजना अंतर्गत दैनंदिन नोंद न भरणाऱ्या शाळा ची यादी







शाळांची यादी पाहण्यासाठी फोटो वरती  क्लिक करा 






















Notice






शालेय पोषण आहार योजनेची मागील दिनांकाची दैनंदिन माहिती (लाभार्थी संख्या/Daily Attendance/Opening Balance/Stock Inward) भरणे करिता २८ ऑगस्ट २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.मात्र राज्यातील काही शाळांची मागील तारखेची माहिती भरणे प्रलंबित आहे.त्यांनी सदरील माहिती भरणेसाठी मुदतवाढ देणेबाबतमागणी केली होती, त्यामुळे सदरील मागील तारखेची माहिती संपूर्णपणे भरण्याकरिता अंतिम मुदतवाढ दि.३१ ऑगस्ट २०१६. पर्यंत देण्यात येत आहे.तरी,ज्या शाळांची माहिती अद्यापही भरावयाची राहिली आहे,त्यांनी तात्काळ भरावी. पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही.आणि शाळांनी ज्या तारखेची माहिती भरलेली नाही, त्या तारखेच्या लाभार्थ्यांनुसार अनुदान शाळांना प्राप्त होणार नाही.याची नोंद घ्यावी.


सूचना :- महाराष्ट्र शासन,शिक्षण संचनालय प्राथमिक पुणे ६  






शिरपूर येथे "व्हिजन कार्यशाळा" संपन्न






 *VISION WORKSHOP* 


मा.डॉ.विद्या पाटील मँडम (प्राचार्य, DIET, धुळे) यांच्या प्रेरणेने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे व गटसाधन केंद्र, पंचायत समिती, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने-


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत *व्हिजन कार्यशाळा*

आज दि.20/08/2016 शनिवार रोजी गटसाधन केंद्र, पंचायत समिती, शिरपूर, जि.धुळे येथे घेण्यात आली.


कार्यशाळेला सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व  विषयसाधनव्यक्ती उपस्थित होते.


*कार्यशाळेत उपस्थिती व प्रमुख मार्गदर्शक - मा.डॉ.विद्या पाटील मँडम (प्राचार्य, DIET धुळे),*

*मा. भरतजी कोसोदे साहेब (गटविकास अधिकारी, पं.स.शिरपूर),*

*मा.डॉ.महाजन सर (अधिव्याख्याता, DIET, धुळे),*

*मा.बाविस्कर सर (अधिव्याख्याता, DIET,धुळे),*

*मा.पी.झेड.रणदिवे (गटशिक्षणाधिकारी, पं.स.शिरपूर)*


*कार्यशाळेत प्रमुख  मार्गदर्शकांद्वारे चर्चीलेले ठळक मुद्दे....* 


 CSR... Corporate Social Responsibility


 PSM कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा 100% प्रगत करण्यात शिक्षकांपासून सर्व पर्यवेक्षिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका


 प्रगत शाळांसाठीचे 25 निकष व त्यानुसार कार्य करणे


 PSM कार्यक्रम शासन निर्णय व अंमलबजावणी


 ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन, डिजीटल शाळा, ISO शाळा, ABL शाळा


 PSM प्रेरणा सभा


 केंद्रप्रमुखांकडून केंद्रातील शाळांचा विविध विषयांवर आढावा


 विद्यार्थी गळती थांबवून सर्व शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणणे, टिकवणे व शिकवणे


 पायाभूत चाचणी विश्लेषण, निष्पत्ती, चर्चा


 अप्रगत विद्यार्थी व त्यांच्यासाठी नियोजन व कृतिकार्यक्रम


 अपेक्षित क्षमतानिहाय व कौशल्य विकसनासाठी नियोजन 

 शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रत्यक्ष वापर व विद्यार्थ्यांना हाताळू देणे, निसर्गाच्या सानिध्यात नेणे


 वाचन, लेखन, संभाषण, स्वअभिव्यक्ती, संख्याबोध, संख्यावरील क्रिया या सर्व अपेक्षित क्षमता प्राप्त होणेसाठी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना 100% प्रगत करणे.


 केंद्रांतर्गत स्नेहमिलन कार्यक्रम - हेतू, रूपरेषा, नियोजन व अंमलबजावणी


 शैक्षणिक मदत (साहाय्य), समुपदेशन, सुलभिकरण, प्रेरणा


 नाविण्यपूर्ण शैक्षणिक Blog ची निर्मिती व Update ठेवणे


 सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व विषयसाधनव्यक्तींनी कार्यशाळेत कृतियुक्त सहभाग घेऊन चर्चा, अनुभव कथन व शंका निरसन करून घेतले.



*✳ उदघाटन -* कार्यशाळेदरम्यान खालील नाविण्यपूर्ण उपक्रमांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


✅1) प्राचार्य मा.डॉ.विद्या पाटील मँडम यांच्या हस्ते Wireless Mouse ने clik करून *'गटसाधन केंद्र शिरपूर' या नावाच्या नाविण्यपूर्ण शैक्षणिक Blog चे उदघाटन* करण्यात आले. Blog बाबत सविस्तर माहिती विषयसाधनव्यक्ती मनोहर वाघ यांनी दिली.


✅2) गटविकास अधिकारी मा.भरतजी कोसोदे साहेब यांच्या हस्ते *विषयसाधनव्यक्तींद्वारे राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक सहाय्य उपक्रम पेटी व ई-शैक्षणिक सहाय्य (whatsapp) या उपक्रमांचे उदघाटन* करण्यात आले. सदर उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती विषयसाधनव्यक्ती रुपेश देवरे यांनी दिली.


कार्यशाळेचे सुत्रसंचालन विषयसाधनव्यक्ती सचिन जडिये, प्रास्तविक गटशिक्षणाधिकारी मा.रणदिवे साहेब व आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी मा.डॉ.निता सोनवणे मँडम यांनी केले.


* उपस्थिती व शब्दांकन *

*सचिन जडिये*

*विषयसाधनव्यक्ती,*

*गटसाधन केंद्र, शिरपूर, जि.धुळे


*प्रचार व प्रसिद्ध *

@ मनाेहर वाघ सर,

साधनव्यक्ती, गट साधन केंद्र, शिरपूर जि.धुळे

9763236070

---------------------------------------------------------------------------------------------------------











आज दिनाक २० /८/२०१६ पंचायत समिती ,शिरपुर च्या ब्लॉग चे शुभारंभ  होत आहे.









गट साधन केंद्र आपले स्वागत करीत आहे 







शिरपुर पंचायत समिती , चित्ररथ




शिरपुर पंचायत समिती , चित्ररथ 



दिनाक १५ ऑगस्ट २०१६