आज दिनांक २९-१-२०१८ रोजी आमच्या पंचायत समिती शिक्षण विभाग शिरपूर जिल्हा धुळे तर्फे धडपड व संघर्षातून शिक्षणाची वाट मार्गक्रमण केल्याबद्दल विद्यार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्या प्रसंगी सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर व आमच्या पंचायत समिती शिक्षण विभागचे गटशिक्षणाधिकारी व सर्व बिटातीत आमचे विस्तार अधिकारी व तालुक्यातील धडपड व संघर्षातून शिक्षणाची वाट मार्गक्रमण करीत असलेले १०० विद्यार्थी व त्यांचे शिक्षक व मी बालरक्षक के बी पवार उपस्थित होतो*
धडपड व संघर्षातून शिक्षणाची वाट मार्गक्रमण केल्याबद्दल आज तब्बल १००विद्यार्थ्यांचा सन्मान विविध मान्यवरांच्या हस्ते तालुका स्तरावर करण्यात आले*
प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले असता.... खरोखरच इतक्या कमी वयात विद्यार्थी किती संघर्षातून शिक्षणाची वाट मार्गक्रमण करीत आहेत याची प्रचिती आली..
विद्यार्थ्यांचे आई नाही तर कोणाचे वडील नाही,आत्यांकडे चाललेलं शिक्षण, कोणाचे कौटुंबिक वादग्रस्त जीवन, कोणाला शिक्षकांनीच दत्तक घेऊन शिक्षण पूर्ण करत असलेली धडपड, आजारपणामुळे मागे पडलेले विद्यार्थीची शिक्षणाकरिता चाललेला संघर्ष,अंपंगावर मात करून शिक्षणाची जिद्द व अंगी महत्त्वाकांक्षा असलेले विद्यार्थी आज खर्या अर्थाने बघीतले,सलाम त्यांच्या जिद्देला व चिकाटीला विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकून आज अंगावर काटे उभे राहिले
☝ आम्हीही सर्वांनी त्यांच्या कायम पाठीशी व मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे प्रण केले आहे.
कधीही त्यांचा काय इतर सर्व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कधीच खचू देणारच नाही. व ही ज्योत कधीच विझूही देणार नाही
आयोजन- पंचायत समिती शिक्षण विभाग शिरपूर जिल्हा धुळे
....शब्दांकन-श्री.के.बी.पवार
प्रा.शि.जि प देविसींगपाडा
प्रचार व प्रसिद्धी :- श्री.मनोहर वाघ सर,तंत्रस्नेही विषय साधनव्यक्ती, शिरपूर,9763236070