तालुकास्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रशिक्षण नियोजन बैठक संपन्न झाली.



दि १२/१०/२०१७ गुरुवार सकाळी १० ते १ वेळेत पंचायत समिती शिरपूर येथे तालुकास्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रशिक्षण नियोजन बैठक जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था धुळे व शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या मार्गदर्शन खाली  घेण्यात अली.

सदर बैठकीस पी झेड रणदिवे ( गटशिक्षणाधिकारी ) सर्व शिक्षण विस्तार अधिकारी , केंद्र प्रमुख , विषय साधनव्यक्ती, समावेशित साधनव्यक्ती , विशेष शिक्षक व प्रत्येक केंद्रातील निवड केलेल्या शाळांचे आयोजक मुख्याध्यापक उपस्थित होते.

सुरुवातिला पी झेड रणदिवे ( गटशिक्षणाधिकारी ) यांनी आयोजक शाळांचे निवडीचे निकष सांगून निवड केलेल्या सर्व शाळांचे अभिनंदन केले तसेच आयोजक शाळांनी करावयाचे प्रशिक्षणा  बाबत सविस्तर मार्गदर्शन केले शाळेच्या परिपाठापासून शालेय परिसराची साफसफाई, शालेय रेकॉर्ड , डिजिटल वर्ग , अध्ययन अध्यापन , लोकसहभागासाठी केलेले प्रयत्न, शालेय व्यवस्थापन समिती सभा, पालक सभा , भौतिक सुविधा, शाळा प्रगत करणेसाठी केलेले प्रयत्न, नावीन्य पूर्ण उपक्रम, प्रसार माध्यमांनी घेतलेले शाळेची दाखल इ बाबीवर PPT द्वारा सादरीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले . यानंतर उपस्थित आयोजक शाळांच्या मुख्याध्यापक मधून काही निवडक शाळांनी उल्लेखनिय बाबीविषीयी सादरीकरण केले.

प्रशिक्षणात शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांना आयोजक शाळेवरती शाळा भेटीदरम्यान दुपारी एक वेळेचे भोजन , दोन वेळी चहापान तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व इतर प्रशासकीय सूचना आयोजक शाळांना देण्यात आल्यात .

यानंतर विषय साधनव्यक्ती श्री मनोहर वाघ यांनी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य भेटीदरम्यान आयोजक शाळांनी PPT द्वारा सादरीकरण कशा पद्धतीने करावे यावर मार्गदर्शन केले. तसेच सदर प्रशिक्षणाचे व्हिडीओ तयार करणे , गट चर्चा व सादरीकरण विद्यार्थ्यांशी सवांद , आदर्श पाठाचे सादरीकरण , व लिंक द्वारा शालेय व्यवस्थापन समिती ची माहिती भरणे  बाबत सविस्तर  मार्गदर्शन केले .

प्रचार :- श्री.मनोहर वाघ,विषयसाधनव्यक्ती,शिरपूर


No comments:

Post a Comment