शिरपूर तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण संपन्न



शिरपूर तालुक्यातील शिक्षकांनी मागेल त्याला प्रशिक्षण या ज़िल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था,धुळे यांनी दिलेल्या आँनलाईन प्रशिक्षण मागणी लिंक वरती नाव नोंदणी केलेल्या सर्व ३५ ज़िल्हा परिषद शिक्षकांना मुकेशभाई पटेल मिलिटरी स्कूल तांडे शिरपूर येथे संपन्न झाले या प्रशिक्षणाचा कालावधी दिनांक ७/३/ २०१७ ते ८/३/२०१७ होता या प्रशिक्षणाचे उद्धघाटन श्री राणा सर प्राचार्य मुकेशभाई पटेल मिलिटरी स्कूल तांडे शिरपूर यांनी केले या प्रशिक्षणास श्री .पी . झेड . रणदिवे गट शिक्षणाधिकारी शिरपूर  व श्री आर . के . गायकवाड विस्तार अधिकारी यांनी भेट दिली व मार्गदर्शन केले या प्रशिक्षणाचा उद्देश सर्व शिक्षकांना तंत्रस्नेही बनविणे व आपल्या अध्यापनात तंरज्ञानाचा वापर गुणवत्ता वाढीसाठी कसा करावा तसेच नवनवीन तंत्रे शिकून घेण्या साठी होता . या प्रशिक्षणात

१)ई मेल बनविणे ,

२)गूगल ड्राइव्ह वापर ,

३)शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे ,

४)सोशियल मीडियाचा वापर ,

५)ऑनलाईन टेस्ट घेणे व तयार करणे ,

६)गूगल फॉम्स तयार करणे ,

७) वर्चुअल कलासरूम तयार करणे

८) गूगल प्लस

९) ppt तयार करणे

१०) गूगल म्यॅप वरती स्कूल टाकणे

११) वेबसाईड चे प्रकार

१२) ब्लॉग तयार करणे

तशेच मुकेशभाई पटेल मिलिटरी स्कूल तांडे शिरपूर चे डिजिटल व ई लर्निंग कलासरूम दाखवलीत या प्रशिक्षणाचे सुलभक राज्य तंत्रस्नेही साधनव्यक्ती श्री मनोहर पांडुरंग वाघ हे होते यांनी सर्व शिक्षकांना सोप्या व सरळ भाषेत दोन दिवस संपूर्ण माहिती दिली या प्रशिक्षणास श्री अशोक ढिवरे ,श्री दिनेश धनगर ,श्री गणेश सोनावणे या तंत्रस्नेही शिक्षकानी उत्तम साधनव्यक्ती म्हणून मागदर्शन केले या वेळी पुरुषोत्तम बागुल ,दिपक कोळी ,प्रमिला मुदवडकर ,माधवी देसले यांनी उपसथती नोंदवली

✍ प्रसिद्धी व प्रचार

आपला तंत्रस्नेही सुलभक साधनव्यक्ती

श्री मनाेहर पांडुरंग वाघ सर

साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे

📱 9763236070


3 comments:


  1. प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी होण्याचे सौभाग्य आम्हास मिळाले.खूप नवनविन तांत्रिक बाबी समजल्या.
    धन्यवाद वाघ सर आणि संपूर्ण टिम.
    .... अशोक सोनवणे
    जि.प. शाळा टेंभेपाडा

    ReplyDelete
  2. उपयुक्त प्रशिक्षण

    ReplyDelete