भोईटी केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न झाली

*भोईटी केंद्र क्रिडास्पर्धा*

     *शिरपुर तालुका आदिवासी भागातील जिल्हा परिषद लाकड्या हनुमान शाळेत भोईटी केंद्रस्तरीय बाल-कला,क्रीडाव सामान्यज्ञान स्पर्धा सन् - २०१७ /१८श्री.बी.एस्.कोळी(मा.शि.वि.अ.),श्री.आसाराम धनगर(मा.के.प्र.)यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या.

      *दि.१३जाने.२०१८शनिवार सकाळी क्रीडा मैदानावर भोईटी केंद्रातील जि.प.१९शाळा दाखल झाल्या.प्रत्येक शाळेच्या खेळाडू संघाला एक लहानसे शाळेच्या नावाचे बँनर देण्यात आले.गृपलीडरचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते कमळपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.खेळाडूंची प्रतिज्ञा घेऊन "मशाल"ने कार्यक्रमाचे  उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमात ५००विद्यार्थी सहभागी झाले.कार्यक्रम खुप सुंदर झाला.या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधु-भगींनी मनापासून सहकार्य केले.सर्वांचे मनस्वी आभार

*मैदान आखणी - श्री.अशोक पाटील,श्री.गणेश शिंदे,श्री.शिवराम पाडवी, श्री.सोनवणे सर,श्री.पवार सर,लाकड्या हनुमान शाळेचे विद्यार्थी यांचे मनस्वी आभार.

    *भोजन स्वादिष्ट  तयार करुन- विद्यार्थ्यांची सेवाकेल्याबद्दल श्री.जितेंद्र बाविस्कर, श्री.बारी सर यांचे खुप-खुप आभार.

*सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी सावित्रीच्या लेकींनी मदत केल्याबद्दल महिला भगिनींचे मनस्वी आभार

     *सर्व खेळांमध्ये  आपली जबाबदारी उत्कृष्टपणे चोखबजावणारे मा.पंच,मा.गुणलेखक,मा.वेळअधिकारी यांचे मनस्वी आभार.

       *स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा नियोजन समिती तयार करण्यात आली.समितीचे नियोजन यशस्वी झाले.

     *अध्यक्ष- श्री.गोपाल आव्हाड

    *सहकार्य*

*श्री.राजेश राठोड*

*यांचे खूप-खुपआभार*

*बक्षिस वितरण कार्यक्रमात विजयी खेळाडुंना मान्यवरांच्या हस्ते मेडल,ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गोरविण्यात आले.

       याकार्यक्रमात भोईटी केंद्रातील सर्व शाळांना जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक सहभागी केल्याबद्दल सर्व मुख्याध्यापकांचे मनस्वी आभार.

      कार्यक्रमात नजरचुकीने,अनावधानाने,कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील,कोणाची गैरसोय झाली असेल तर तर जाहीर माफी मागतो.

*स्पर्धा आयोजक शाळा

*श्री.अनिल महिरराव- मुख्याध्यापक, जि.प.शाळा लाकड्या हनुमान

प्रचार व प्रसिद्धी:- श्री. मनोहर वाघ सर,तंत्रस्नेही साधनव्यक्ती, शिरपूर


"अपंग" हा शब्द कानावर पडल्याबरोबर !.......

*अपंग* हा शब्द कानावर पडल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते. त्यात एक हात तुटलेला, एक पाय तुटलेला किंवा दोन्ही पाय तुटलेले, दोन्ही हात तुटलेला, डोळ्यांमधे खाचा पडलेली एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर सहज येऊन जाते. व ह्या व्यक्ती भिक मागत असतील या विचाराने आपल्या डोक्यात कधीकधी त्यांच्याविषयी घृणा, द्वेष किंवा प्रेम निर्माण होते. याचे कारण आपला त्यांच्या विश्वाशी कधीच संबंध आलेला नसतो. परंतु एकदा का आपण त्यांच्या विश्वात डोकावून पाहिले तर आपल्या डोळ्यासमोर आशेचा एक मोठा किरण दिसू लागतो. बालकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर प्रत्येक दिव्यांग बालकामधे विशिष्ट प्रकारची वेगळी कौशल्य, कला ही लपलेलीच असते. गरज असते ती फक्त शोधाची. दिव्यांग मुलांची जगात आज अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की दिव्यांग व्यक्ती ही सर्वसामान्य व्यक्ती एवढेच नव्हे तर किंबहुना त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कर्तुत्व करू शकते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, लुई ब्रेल, हेलेन केलर, ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरियस, गौरी गाळगिळ या लोकांनी दिव्यांगांच्या क्षेत्राविषयी संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडले.

   दिव्यांगांच्या क्षेत्रात काम करणे हे खरच खुप मोठे आव्हान आहे. अंधत्व आले म्हणुन त्यांचे सजीव सृष्टी व सौंदर्य यांचे नाते तुटते असे नाही. अंध मुलगा आपल्या ज्ञानेंद्रियांच्या उपयोगाने इतर संवेदना विकसित करण्यासाठी धडपड करतो. 'पाऊस पडतो' ही संकल्पना डोळ्यांनी अनुभवु शकत नाही. परंतु ध्वनी संवेदनाद्वारे पावसाच्या सरींचा आवाज, ढगांचा कडकडाट ऐकू शकतो. दैवाने दिलेल्या आव्हानांना सामोरे जावून स्वत्वाचा शोध घेणाऱ्या या व्यकतींची झुंज निच्छितच प्रशंसनीय आहे. एकीकडे धडधाकट माणसं मनातून पंगु झालेल्या या जगात 'पंगु' असलेल्या शरीरातील मन मात्र प्रचंड सामर्थ्यशाली. कायम नकारघंटा वाजवणारी सुदृढ मानसं एकीकडे आणि 'आई हे मला जमतय !' , बाबा मी हे करू का ? , सर, मला हे नक्की जमेल. असा आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोण ठेवणारी मुले एकीकडे. निसर्गाने दृष्टि हिरावलेली ही द्रष्टे मुलं बघितली की सृष्टितल्या अनेक लोकांची कीव आल्याशिवाय राहत नाही. शेवटी एकच


*या मुलांना या फुलांना*

*रंग द्या अन गंध द्या*

*या पाकळ्यांना या कळ्यांना*

*साद द्या प्रतिसाद द्या*



लेखन:-श्री राहुल पाटील विशेष शिक्षक पंचायत समिती शिरपुर.

प्रचार व प्रसिद्धी :- मनोहर वाघ सर (तंत्रस्नेही साधनव्यक्ती,शिरपूर)


जिल्हा परिषद शाळा लाकड्या हनुमान येथे बालिका दिन साजरा

*बालिकादिन*

   आज दि.३जानेवारी २०१८ रोजी सकाळी जि.प.शाळा लाकड्या हनुमान शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधुन बालिकादिन साजरा करण्यात आला.

      लाकड्या हनुमान गावात सन्-२०१७ पासुन आज पर्यंत कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातांचा अंगणवाडीताई यांच्या मदतीने शोध घेऊन *कन्यारत्न मातांचा मातांचा गौरव करण्यात आला.*याकार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांचा पेहराव केलेल्या मुलीच्या हस्ते .... *कन्या व मातांचा गौरव करण्यात आला.*

   या कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री.अशोक पाटील यांनी केले.सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश श्री.गणेश शिंदे यांनी टाकला.

     उपस्थित महिला व ग्रामस्थांना मुख्याध्यापक श्री.आनिल महिरराव यांनी आवाहन केले.... *आपली शाळा तंबाखूमुक्त झाली आहे.आपले गाव तंबाखूमुक्त करुया*

   या कार्यक्रमाला गावातील सरपंच,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,अंगणवाडीच्या  ताई,माता पालक संघ पदाधिकारी,किशोरी मुली उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक श्री.अनिल महिरराव यांनी केले.आभार श्री.राहूल पाटील यांनी मानले.

प्रचार व प्रसिद्धी

श्री. मनोहर पांडुरंग वाघ सर


शिरपूर येथे केंद्रप्रमुख व CRG सदस्य नियोजन बैठक संपन्न ....

शिरपूर येथे केंद्रप्रमुख व CRG सदस्य नियोजन बैठक संपन्न ....


PSM अंतर्गत भाषा व गणित अध्ययन समृद्धी कार्यक्रम अंमलबजावणी साठी DIECPD धुळे मार्फत केंद्रप्रमुख व CRG सदस्यांची नियोजन बैठक PBM हायस्कुल शिरपूर येथे संपन्न झाली. सदर बैठक मा.डॉ. विद्या पाटील मॅडम, प्राचार्य DIECPD धुळे, यांच्या प्रेरणेने, व मा. वरिष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. मा.जितेंद्र पाटील सर व मा. सतिष जोशी सर, विषय सहायक, DIECPD, धुळे यांनी मार्गदर्शन केले.

सदर बैठकीस गटशिक्षणाधिकारी मा.रणदिवे साहेब, मा. डॉ. नीता सोनवणे मॅडम, सर्व केंद्रप्रमुख व त्यांच्यासह केंद्रातील भाषा व गणित विषयाचे प्रत्येकी 2 CRG सदस्य उपस्थित होते.

बैठक नियोजनासाठी विषयसाधनव्यक्ती सचिन जडिये व मनोहर वाघ यांनी तंत्रस्नेही सहाय्य सहपरिश्रम घेतले, तसेच दीपक कोळी, प्रमिला मुदावडकर, प्रमोद भोई, पुरुषोत्तम बागुल,निलेश मराठे,मोतीलाल पाटील,राहुल पाटील, स्वाती देवांग, यांचे सहकार्य लाभले.


मीटिंग दि.03/01/2018

वेळ- सकाळी 9 ते 10.30

स्थळ - PBM हायस्कुल, शिरपूर


शिरपूर BRCचे  सर्व विषयसाधनव्यक्ती, समावेशीत विषयतज्ज्ञ, विशेष शिक्षक  उपस्थित होते

प्रचार व प्रसार

श्री. मनोहर पांडुरंग वाघ सर